आकाशाला भिडताना…
✍🏻. गजानन खंदारे आकाशात झेप घेण्यापूर्वी बेंगळुरू विमानतळावरून माझ्या मुलाचा फोन आला.“पप्पा, पुढील काही वेळ मी हवेत असणार. फोन फ्लाइट मोडवर राहील.”मी पुढचं काही बोलणार, एवढ्यात फोन कट झाला. माझा मुलगा पहिल्यांदाच विमानप्रवास करत होता, आणि त्याच्या या यशाचा मला मनस्वी अभिमान वाटत होता. त्याच्या डोमेस्टिक क्लासची व्यवस्था केली होती. तरीही, त्याच्या या वाक्याने मला…
