घेता कोणाची,देता कोणाची! वाण नेमके कशासाठी ?
शेतातली नविन जिन्नसाची नव्हाळी घेऊन आई एखाद्या घरी पाठवायची.तेव्हा त्या घरातील स्त्री नम्रपणे म्हणायची—” बाळ, आमच्याकडे आधीच माहेरकडून वानूळा आलाय.”मग प्रश्न पडायचा हा वानूळा म्हणजे नेमकं काय?आणि संक्रांतीला स्त्रिया “वाण” का देतात?तर या प्रश्नाचे सोपे उत्तर म्हणजे“वाण” हा बोलीभाषेतील अतिशय प्रभावी शब्द आहे.ज्याला कशाचीच वाण नाही—म्हणजे कमतरता नाही—अशी संपन्नता आणि पुरेपणाची जाणीव हा शब्द व्यक्त…
