

बस मध्ये खाद्यपदार्थ विकून तो आपला उदरनिर्वाह करू शकत असेल का?
✍ गजानन धामणेमुक्त पत्रकार, वाशिम 👉 आज मला कामानिमित्त चिखली व तेथून पुढे वरुड बु. येथे जायचे होते. दूरच्या प्रवासात जायचे म्हटले की, सकाळी लवकरच निघावे लागते. आजही सकाळी साडेआठलाच मी घराबाहेर पडलो. 8.45 वाजता वाशिम – यावल गाडी मिळाली. त्यामुळे थेट चिखली पर्यंत एकाच बसने पोहोचणार होतो. सकाळचीच वेळ असल्यामुळे गाडीत जागाही मिळाली. गाडी…

बुद्धाच्या देशात अजूनही विचारांना गोळ्या, काळं आणि धमक्या !
धर्मांध प्याद्यांना आमचा निर्वाणीचा इशारा अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेली काळी शाईफेक ही केवळ एका व्यक्तीवर नाही, तर वैचारिक आंदोलनावर रचलेली नियोजित आणि भ्याड कृती आहे.या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पण आम्ही केवळ निषेधावरच थांबणार नाही. आम्ही स्पष्ट सांगतो या घटनेमागे कोणताही वैयक्तिक वाद नाही, तर ही देशभर चालवली जाणाऱ्या विरोधी…

तब्ब्ल 4 हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यावर काळी कारवाई !कशासाठी?
शेतकरी, पिक विमा आणि काळी यादी: सत्य शोधण्याची गरज महाराष्ट्र सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. पिक विमा योजनेत खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना आता काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. यापूर्वी अशी कारवाई फक्त सेवा केंद्रे, एजंट आणि विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींवर होत होती. परंतु आता थेट शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. राज्य…

पहिला हूं तरी म्हण…🖋️ विठ्ठल कोतेकर, कोल्हापूर
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक विद्वान माणसं वेळोवेळी भेटत असतात. कोण एका विशिष्ट टप्यावर, कोण वळणावर, तर कोण एका छोट्याशा क्षणात आपल्याला आयुष्यभर पुरेल असा धडा शिकवून जातं. हे सगळं घडतंच. पण त्या सल्ल्याला, त्या शिकवण्याला मनापासून ऐकलं गेलं, तर आयुष्य खरंच सोनं होतं. माझ्या वडिलांचं नाव होतं मारुती सखाराम कोतेकर. त्यांचे वडील, म्हणजे माझे आजोबा…
-बा… विठ्ठला, तू असा गप्प का?
बा… विठ्ठला, तू असा गप्प का? तुझ्या चराचरात तुलाच शोधतो,तुझ्या नावानं लुटणाऱ्या ढोंग्यांनी! गाथा बुडवली तुझ्याच नजरेसमोर,तुकोबाला आत्मक्लेशात तडफडत ठेवलं,तेरा दिवस उपोषण, कण्हत तुझ्यासाठी,तरी तू निशब्द, तेव्हाही, आत्ताही! विचारांची हत्या करून,सदेह वैकुंठाला पाठवलं तुकोबाला,तुझ्या नावाची दुकानदारी मांडली,तरी तू गप्प, तेव्हाही, आत्ताही! जातीय भांडणं पेरणारे,अमृतकुंडात अपवित्रता करणारे,तुझ्याच नावावर माणसाचं रक्त सांडतात,तरी तू कमरेवर हात ठेवून उभा,तेव्हाही,…

बँकिंग व फायनान्स कंपन्यांची दादागिरी: खाजगी सावकारी बंद करून NBFC ना मोकळे रान
गेल्या दोन दशकांत भारतात बँकिंग आणि अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले. १९६९ मध्ये राष्ट्रीयकरण झाल्यानंतर सहकारी संस्था, जिल्हा बँका आणि पतसंस्था ग्रामीण भागातील आर्थिक कणा होत्या. मात्र १९९१ नंतरच्या उदारीकरणाच्या धोरणांमुळे खाजगीकरण, सवलती, आणि बँकांचे विलीनीकरण यामुळे या संस्था मागे पडल्या. खाजगी सावकारी बेकायदेशीर घोषित करून त्यांच्यावर कठोर कायदे लावले गेले, पण त्याचवेळी NBFC म्हणजेच बिगर-बँकिंग…

चार झाडांचा “प्रसाद” आणि सावलीचा संकल्प
सुरवातीचे ताजे कलम- खालील मजकूर हा उपहासात्मक आणि वैयक्तिक निरीक्षणा वर आधारित आहे. याचा कुठल्या व्यक्ती, संस्था किंवा अन्य कुठल्याच घटकाशी दुरान्वये ही संबंध नाही. योगाने केवळ लोकशाहीतील संवेदनशीलतेचा आग्रह किंवा अन्वयार्थ म्हणुन गेंड्याची कातडी ओढलेल्या “लोक व प्रशासन व्यवस्थेतील” जबाबदार सेवकांनी स्वतःच्या जबाबदारी प्रती इमान ठेवायला आमची काही हरकत नाही- ✍ पटतंय का पहा!….

लोढाईच्या माळावरील श्रध्येचं झाड आणि नवसाचं गाठोडं!: गजानन खंदारे
पटतंय का पहा! ✍️ गजानन खंदारे रिसोड श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही भक्ती मार्गाची दोन रूपं असली तरी त्यांचा प्रवास वेगवेगळा असतो.विचारपूर्वक श्रद्धा माणसाला आत्मबल व जागृती आत्म प्रगती देते, तर अंधश्रद्धा अज्ञानातून उद्भवते आणि गुलामगिरीकडे घेऊन जाते.”अनेक दुःखाचे कारण हे अंधश्रद्धा आहे. काल परवा दर्शनासाठी म्हणुन लोढाई च्या माळावर गेलो. यात कुणाला काही वेगळे वाटण्याचे…

सिबिल विरोधात आवाज उठवणे गरजेचे ,आपण काय करू शकतो
सिबिल स्कोअर ही संकल्पना पूर्वी केवळ कर्ज व्यवहारापुरती मर्यादित होती. पण आज त्याचा वापर केवळ आर्थिक चौकटीतच नाही तर वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याच्या निर्णयांमध्येही होत आहे. नोकरीच्या मुलाखतीत, घर भाड्याने घेताना, लग्न जमताना – अगदी अशा ठिकाणी सुद्धा सिबिल स्कोअर विचारात घेतला जातो. पूर्वी चारित्र्य प्रमाणपत्र मागितलं जायचं, आता सिबिल स्कोअरच पात्रता आणि स्वभावाचे प्रमाणपत्र…