महासत्तेच्या हिंदू राष्ट्राकडे वाटचाल : सुरुवात कुत्र्यांपासून!

१४ हजार शाळा बंद करून गुरुजी लागले कुत्र्यांच्या मागे!जनगणनेचा “फडतूस” उत्सव


महासत्तेच्या हिंदू राष्ट्राकडे वाटचाल : सुरुवात कुत्र्यांपासून!

✍🏼 गजानन खंदारे
मास्तर उर्फ गुरुजींना आमचा अष्टांग-स्पर्श!…
आणि अंध-भक्तांना आशीर्वाद!
गुरुजी,
संक्रांत जवळ आली आहे.
वाण घ्यायचं आहे,
पण त्याआधी आपल्याला
एक अत्यंत महत्त्वाचं राष्ट्रीय कर्तव्य
पार पाडायचं आहे—
एव्हाना “फडतूस” सिस्टमचा निरोप
आपल्यापर्यंत पोहोचलाच असेल.
कुत्र्यांची जनगणना!

लग्नासाठी स्थळ शोधताय? मग इथे सर्वच मोफत आहे. Click here 💥


… व्हय,! खरंय ते..
विद्यार्थी स्क्रोलिंगमध्ये निपुण झाल्याने
मास्तरांना आता
कुत्र्यांची जनगणना करून
खूप मोठं राष्ट्रीय कर्तव्य
पार पाडायचं आहे.
पण काळजी नसावी.
नुकतीच भाद्रपदी संपल्याने
सध्या गावातली बरीच कुत्री शांत आहेत.
बाकी “पक्षांतरित” कुत्र्यांची
वर्गवारी निश्चित होईपर्यंत
त्यांना या जनगणनेत धरू नये—
असं अ-लिखित परिपत्रक
समजावं.
मतदार याद्या अपडेट झाल्या,
जनगणनेचा डाटा फीड झाला,
आधार–पॅन–मोबाईल–बँक–लाईफ
सगळं लिंक झालं…
आता उरलंय ते फक्त—
पाळीव, बेवारस, भटकी
आणि मोकाट कुत्री!
आमच्या गल्लीत एकुण सहा आहेत.
“पण देशात किती असतील
हे शोधल्याशिवाय
आपण महासत्ता कसे होणार?”
तेव्हा—
एक कुत्रा पाळीव—
मालक सापडेलच.
दुसरा बेवारस—
कुटुंब कार्ड आणि वंशावळ
शोधावी लागेल.
दोन भटकी—
रहिवासी व डोमिसाईल दाखल्यासाठी
अर्ज दिलाय.
दोन मोकाट—
“आम्ही कुणाच्या ताब्यात नाही”
असा शपथनामा देतील का
की स्वघोषणापत्र भरतील,
यासाठी नोडल अधिकाऱ्याचं
मार्गदर्शन घ्यावं लागेल.
झिरो ते पाच वयोगट,
दिवस गेलेली,
वयात आलेली—
सगळ्या प्रकारच्या कुत्र्यांचा
डाटा नीट फीड करावा लागेल.
पोरांच्या शिक्षणाचं टेन्शन
घेऊ नका.
क्लस्टर शाळेऐवजी
प्रत्येक गाव-कुसात
सरस्वती ऐवजी सारस्वताच मंदिर बांधता येईल का?—
शिक्षण आपोआप येईलच!

बुका लाऊन तुका सांगणे हल्ली काही लोंकाचे धंदे झाले! click here

गुरुजी,
तुम्ही आता फक्त शिक्षक
राहिलेले नाहीत.
झोळीवाल्या-ढेरीवाल्या बाबाच्या कृपेने
थेट राष्ट्रनिर्माते
बनले आहात!
तुमच्या जबाबदाऱ्या—
सर्वेक्षक,
डेटा ऑपरेटर,
जनगणना अधिकारी,
नोडल ऑफिसर,
BLO,
बीट सुपरवायझर…
आणि गरज पडली तर
कुत्रा-निरीक्षक!
हिंदू राष्ट्राच्या संकल्पानंतर
तुमच्या हाताला
साक्षात “अन्नपूर्णेची” चव आली आहे.
दुपारच्या भोजनाचा सुगंध
चार फरलंगापर्यंत
दरवळतो आहे.
तसंही पुढचं टार्गेट ठरलेलं आहे—
१४,००० शाळा अजून बंद करून
आखाड्यांची संख्या वाढवता येईल.

घोषणापत्र
हा लेख पूर्णतः उपहासात्मक व सामाजिक भाष्याच्या हेतूने लिहिण्यात आलेला आहे. कोणत्याही व्यक्ती, संस्था, शिक्षकवर्ग, प्राणी किंवा श्रद्धेचा अपमान करण्याचा उद्देश नाही.
— गजानन खंदारे
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, वाशिम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top