लोढाईच्या माळावर: गर्दीचा बाजार!
अश्विन शुद्ध नवमीला मी लोढाईच्या माळावर दर्शनासाठी गेलो होतो. त्या दिवशी इथे दरवर्षी एकदिवसीय मोठी यात्रा भरते. “लोढा-आई”चा माळ म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत ठिकाण – हिरवीगार टेकडी, जंगलाचं कवच आणि सभोवताल पसरलेलं गायरान व जंगल क्षेत्र . इथलं मंदिर हे केवळ दगड-विटांचं बांधकाम नाही, तर ग्रामीण लोक आणि कृषी संस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे….
