सर, जरा हे बघा… 🖋️विठ्ठल कोतेकर,

कधी कधी असं वाटतं, की आपण एक वाक्य बोलतो, आणि समोरचा माणूस ते मनावर घेतो…पण त्याच्या मनावर घेतलेल्या त्या एका वाक्याचं उत्तर आयुष्य त्याला देतं. असा काहीसा अनुभव नुकताच मला आला…*रवी चौगुले* नाव घेतलं, की माझ्या डोळ्यासमोर एक चेहरा उभा राहतो, साधा, शांत, पण आतून खूप प्रामाणिक. शिकायची तहान असलेला, सतत विचार करणारा, आणि मुख्य म्हणजे… स्वतःला रोज तपासणारा माणूस. रवी चौगुले मूळचे इचलकरंजीचे.

माईंड ट्रेनर 9921111665

रवीची आणि आमची ओळख झाली *‘मराठा विकास संस्था’(MVS)* मधून. व्यवसायाच्या निमित्ताने भेट झाली पण ती ओळख नुसती भेट बनून राहिली नाही… ती एक भावनिक आठवण झाली.रवी पहिल्यांदा 21 दिवसाच्या ‘मी भारी तर गाव भारी’ वर्कशॉपला आले. तिथं त्यांनी जे काही अनुभवलं, ते मनापासून घेतलं. त्यांना वाटलं “हे काहीतरी वेगळं आहे, हे नक्कीच माझ्या आयुष्यासाठी उपयोगी ठरेल.” ते तिथंच थांबले नाहीत…ते आले तीन दिवसाच्या रेसिडेन्शियल राधानगरीच्या वर्कशॉपला, मग वन डे वर्कशॉप केला. आणि या सगळ्यात त्यांनी सतत एक गोष्ट सांभाळून ठेवली, शिकलेलं विसरायचं नाही, आणि ते वापरत राहायचं.आमच्या राधानगरीच्या वर्कशॉपमध्ये, आम्ही एक अतिशय महत्त्वाची प्रक्रिया शिकवतो *व्हिजन वर्कबुक* लिहिण्याची.म्हणजे काय?तर स्वतःचं ध्येय उद्दिष्ट, स्वतःच्या शब्दांत, स्पष्ट लिहून घेणं.जणू एक करार स्वतःशी “मी हे करणार.”त्याच वर्कशॉपमध्ये, रवीने त्यांच्या व्हिजन वर्कबुकमध्ये लिहिलं होतं..”1 जुलै 2025 पासून मला पूर्वी होती त्यापेक्षा दुप्पट पगाराची नोकरी मिळालेली आहे.” तेव्हा त्यांनी मला ती वही दाखवली होती…

तुमचं कुटुंब,मुले व तुम्ही सुद्बा मोबाईलच्या कैदेत? हा vdo तुम्हाला जागं करेल ! click

अगदी विश्वासाने, जणू तो भविष्याचा आराखडाच त्यांच्यासमोर ठेवला होता.काल परवा रवी पुन्हा भेटले. आणि म्हणाले, “सर, जरा हे बघा.”त्यांनी मोबाईल काढला…आणि एक ईमेल उघडून मला दाखवला..कंपनीकडून आलेला ऑफर मेल.त्यांना बरोबर 1 जुलै 2025 पासून लिहिलेल्या पगाराची नोकरी मिळाली होती.जसंच्या तसं…जसं त्यांनी लिहिलं होतं.त्या क्षणी माझ्या अंगावर काटा आला.शब्दच सापडले नाहीत.किती सहज बोलतो आपण..”गोल लिहा… व्हिजन ठेवा…”पण कोणीतरी त्या गोष्टीला जीव ओतून जगायला घेतलं,आणि त्याचा साक्षात परिणाम त्यांच्या हाती पडला.हे बघणं… हे फक्त समाधान नव्हतं…हे एक उत्तर होतं.आज मी हे सगळं लिहितोय, कारण रवी चौगुले हे नावफक्त एका सहभागीचं नाही,तर त्या प्रत्येक व्यक्तीचं प्रतिनिधित्व करतं ज्यांनी सेल्फ डेव्हलपमेंट सायकॉलॉजीवर विश्वास ठेवला आहे. ज्यांनी आपल्या बदलावर विश्वास ठेवला आहे.रवींनी शिकलेलं वापरलं, प्रयत्न केले, सतत संपर्कात राहिले,प्रश्न विचारले, स्वतःला तपासत राहिले.ते ‘ *टाळ्या वाजवणारे’* विद्यार्थी नव्हते…ते *मनात टाळी वाजवणारे* विद्यार्थी होते…स्वतःसाठी, स्वतःच्या आयुष्यासाठी.आणि म्हणून आज…त्यांचा गोल पूर्ण झालाय.कालच ते तिथे हजर झाले.त्यांचं मनापासून अभिनंदन.ही गोष्ट लिहतोय मी,कारण मला खात्री आहे..हा अनुभव नक्कीच कुणालातरी आपला वाटेल,आणि कुणीतरी आजच आपली वही उघडेलआणि लिहील…“मी हे करणार.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top