आमचा दाढीवाला बाबा : गजानन भोयर 🚩
आजच्या काळात “दाढीवाले बाबा” ही संज्ञा लोकांना दोन अर्थांनी ठाऊक आहे. एक म्हणजे जनतेला स्वप्नं दाखवून फसवणारे, सत्तेसाठी झगडणारे आणि रोज नवे भ्रम पेरत मुर्ख बनवणारे बाबा. दुसरीकडे अध्यात्म, प्रवचनं आणि चमत्काराच्या नावाखाली लोकांच्या श्रद्धेचं शोषण करणारे बाबा.सध्या देशात या बाबांचं अक्षरशः पीक आलंय. झोळी वाल्या फकीर बाबा पासुन ते गुआहटीच्या महाराजांपर्यंत, बागेतल्या लंगूरा पासुन तर वगारी पर्यंत टीव्हीवर रात्रंदिवस या बाबा-दादा लोंकानाचेच राज्य आहे देशातील जनतेला आंधळं, बहिरं आणि मूर्ख बनवण्याचं काम ही मंडळी पद्धत शीर पणे करतात. भक्ती, राजकारण आणि अध्यात्माच्या नावाखाली लोकांच्या डोक्यावर गोंधळाचा डोंगर रचतात. आसाराम च्या बागेत, अन मिसरा च्या मिश्रणात,अमके–चमके–तमके बाबा… जनतेला गुंगारा देत आपली झोळी भरून पोळी शेकणं हेच जणू त्यांचं धर्मकारण.आणि राजकारण हल्ली शालेय मुलांच्या मेंदूतसुद्धा या बाबांचा ठसा जाम बसलाय. कावडवाले, दहीहंडीवाले, गणपतीवाले, डीजेवाले—जिथे बघावं तिथे फक्त बाबा आणि बाबा! म्हणून उद्या परीक्षेत “बाबांचे प्रकार स्पष्ट करा” असा प्रश्न आला, तरी नवल नाही.

पण या सगळ्या गदारोळात
एक वेगळाच दाढीवाला बाबा
आमच्या नजरेत भरतो आहे—
अर्थात “ब्रिगेडी” गजानन बाबा भोयर.
हे बाबा टीव्हीवर लोकांना फसवत नाहीत, तर लोकांच्या हक्कासाठी रस्त्यावर लढतात.
हे बाबा प्रवचनं करून मूर्ख बनवत नाहीत, तर संघटनं उभारून जनतेला सबळ करतात.

संभाजी ब्रिगेड शाखाध्यक्ष म्हणून सुरुवात करून विभागीय अध्यक्ष या जबाबदारीपर्यंत आलेल्या गजानन भोयर यांचा प्रवास म्हणजे संघर्ष, आणि संघटनात्मक कौशल्याची कहाणी आहे. त्यांनी केवळ पदासाठी नव्हे, तर समाजहितासाठी संघटन मोठं केलं. त्यांचं काम म्हणजे लोकांमध्ये आत्मविश्वास जागवणं आणि त्यांना स्वाभिमानानं जगायला शिकवणं.
त्यांच्या या कार्य वृत्तीचं दर्शन अलीकडेच घडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना जे जमलं नाही ते ही ब्रिगेडची पोरं करून दाखवतात.

चींचांबा पेन, ता. रिसोड, जि. वाशिम येथे २५ सप्टेंबर रोजी येथे अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अनावरण झालं. हा पुतळा म्हणजे केवळ शिल्प नव्हे, तर स्वराज्याच्या संकल्पनेचं, पराक्रमाचं आणि आत्मसन्मानाचं प्रतीक आहे.
गजानन भाऊच्या पुढाकारातून शासनमान्य पद्धतीने आधीच अनेक ठिकाणी स्मारकांची उभारणी झाली आहे—अटकळी, चिंचखेडा, टो, एकांबा आणि आता चींचांबा पेन. गावागावातील लोकांच्या सहयोगाने उभारलेली ही स्मारकं पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणेचे दीपस्तंभ ठरतील यात शंका नाही.
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाजघटकांचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान आणि आत्मविश्वासाचे मूर्तिमंत रूप आहेत. त्यांच्याकडून आपण शिकतो न्याय, समानता, शौर्य, स्वाभिमान आणि लोकहितासाठी अखंड झटणं. गजानन भोयर यांचे काम या शिकवणीचं जिवंत उदाहरण आहे.

देशात बनावट बाबांची गर्दी आहे, पण आमच्या भाग्यात खरा दाढीवाला भला माणूस लाभला आहे—गजानन भोयर. या नावात आपुलकी आणि आदर आहे.वेळ प्रसंगी “आक्रमकता ” पण दडलीय.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण विभाग त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा अर्पण करतो.
जय जिजाऊ! जय शिवराय! 🚩
ताजी गोष्ट : दाढी वाले बाबा हे आजच्या दिवसापूरते आहेत, बाकी आमच्या हक्काचे, म्हणजे हाक दिल्यावर हजर होणारे गजु भाऊच आहेत! तेव्हा त्यांना आम्ही बाबा बनू देणार नाही. ही झोळी वाले बाबा कि गॅरंटी
Disclaimer
वाढदिवस साजरे करणे किंवा व्यक्तीपूजा करणे हे आमच्या तत्त्वात बसत नाही.
मात्र, चांगल्या व्यक्तीच्या चांगल्या कार्याचा गौरव करणे आणि त्यातून प्रेरणा घेणे हा या लेखाचा मूळ उद्देश आहे.
हे लिखाण केवळ त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आहे,
लेखन :गजानन खंदारे मोप

Hsah
खुप छान
हार्दिक 💐💐💐