
श्रावण नव्हे भक्ती मास — शिवभक्तीची खरी वाट कोणती?
“श्रावण महिना आला की सर्वत्र भक्तिमय वातावरण असते.”मंदिरात रांगा, उपवासाचे फराळ, आरत्या, अभिषेक, रुद्रपठण— हे सगळं आपल्याला दरवर्षीच दिसतं. पण या सगळ्या धावपळीच्या भक्तीत “शिवतत्त्व” नेमके कुठे आहे, हे आपण विसरतो का ? श्रावण महिना म्हणजे केवळ आषाढानंतर आलेला पावसाळ्याचा महिना नव्हे, तर आत्मिक तपश्चर्येचा, संयमाचा, साधनेचा काळ असतो.म्हणूनच याला “भक्ती मास” असं मानलं जातं….