
बहिणी बोगस झाल्या, की सरकारचं नातं?
गजानन खंदारे ✍ पटतंय का पहा ! आपल्या आयुष्यात असंख्य नाती असतात. काही रक्ताची, काही ओळखीची, काही विचाराची, काही सहवासाची… भावनिक किंवा कर्तव्य भावनेतून जबाबदारीने निर्माण होणारी खरी मौल्यवान नाती तीच असतात जी मायेने आणि कर्तव्यभावनेने घट्ट विणली जातात. आई-वडील, भाऊ-बहीण ही अशीच नाती. यात स्वार्थ नसतो, पैशाचा हिशोब नसतो, यात असतो तो एकमेकांच्या अस्तित्वाचा…