
बस मध्ये खाद्यपदार्थ विकून तो आपला उदरनिर्वाह करू शकत असेल का?
✍ गजानन धामणेमुक्त पत्रकार, वाशिम 👉 आज मला कामानिमित्त चिखली व तेथून पुढे वरुड बु. येथे जायचे होते. दूरच्या प्रवासात जायचे म्हटले की, सकाळी लवकरच निघावे लागते. आजही सकाळी साडेआठलाच मी घराबाहेर पडलो. 8.45 वाजता वाशिम – यावल गाडी मिळाली. त्यामुळे थेट चिखली पर्यंत एकाच बसने पोहोचणार होतो. सकाळचीच वेळ असल्यामुळे गाडीत जागाही मिळाली. गाडी…