
बँकिंग व फायनान्स कंपन्यांची दादागिरी: खाजगी सावकारी बंद करून NBFC ना मोकळे रान
गेल्या दोन दशकांत भारतात बँकिंग आणि अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले. १९६९ मध्ये राष्ट्रीयकरण झाल्यानंतर सहकारी संस्था, जिल्हा बँका आणि पतसंस्था ग्रामीण भागातील आर्थिक कणा होत्या. मात्र १९९१ नंतरच्या उदारीकरणाच्या धोरणांमुळे खाजगीकरण, सवलती, आणि बँकांचे विलीनीकरण यामुळे या संस्था मागे पडल्या. खाजगी सावकारी बेकायदेशीर घोषित करून त्यांच्यावर कठोर कायदे लावले गेले, पण त्याचवेळी NBFC म्हणजेच बिगर-बँकिंग…