
शाळेच्या प्रयोगशाळेत भाषेच्या गोंधळाचा भुसा!
डोक्यात भुसा किंवा हवा भरली की माणसाला अनेक गोष्टींबद्दल अनाठायी कुतूहल निर्माण होतं.आणि मग त्या कुतूहलाच्या भरात तो माणूस काही अफलातून प्रयोग करू लागतो.मुळात ही गोष्ट थोडी मानसशास्त्रीय असली तरी फार खोलात न शिरता आपण एका साध्या निरीक्षणाकडे वळूया —म्हणजेच एखाद्या मंत्र्याच्या डोक्यात एखादी कल्पना आली, की त्याचा पहिला प्रयोग नेमका “विद्यार्थ्यांवर” का होतो?शाळा मग…