महाराष्ट्र हादरला! परिक्षेत कमी मार्क शिक्षक बापाने घेतला पोरीचा जिव ..

जीर्ण भिंती आणि आभासी जग

ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून, ती समाज, शिक्षण आणि शासन व्यवस्थेला आरसा दाखवणारी आहे. साधनाच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत, ज्यांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर टाकले जाणारे दडपण किती घातक ठरू शकते? पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या मानसिकतेचा मेळ कसा घालायचा? शिक्षक असलेल्या व्यक्तीच्या हिंसक वर्तनामागील कारणे काय? आणि सर्वात महत्त्वाचे, अशा घटना टाळण्यासाठी आपली सामाजिक आणि शैक्षणिक व्यवस्था किती सक्षम आहे? साधनाचा मृत्यू हा केवळ एका मुलीचा अंत नाही, तर समाजातील अनेक दोषांचा परिपाक आहे. शिक्षणातील स्पर्धा, पालकांच्या अवास्तव अपेक्षा, कौटुंबिक हिंसा आणि व्यवस्थेतील उदासीनता यांचा बळी ती ठरली. या घटनेतून धडा घेऊन आपण आपल्या मुलांना यशस्वी करण्यापेक्षा सुखी आणि समजूतदार बनवण्यावर भर द्यायला हवा. शिक्षण व्यवस्थेत मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे, पालक आणि शिक्षकांना संवेदनशील बनवणे आणि कौटुंबिक हिंसेला आळा घालण्यासाठी कठोर कायदे लागू करणे गरजेचे आहे. साधनाच्या मृत्यूने आपल्याला जागे केले पाहिजे, जेणेकरून अशी हृदयद्रावक घटना पुन्हा घडणार नाही.

खासगी शिकवणीत बारावीच्या सराव परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून चिडलेल्या बापाने आपल्या मुलीला एवढी बेदम मारहाण केली की तिचा मृत्यू झाला. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही काळीज हेलावणारी घटना घडली. साधना धोंडिराम भोसले (वय १७) असे मृत मुलीचे नाव आहे. धोंडिराम भोसले हे गावातील माध्यमिक शाळेत शिक्षक असून, मुलीला डॉक्टर बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते. शिकवणीसाठी खर्च करत असताना तिचे गुण कमी आल्याने त्यांनी रागाच्या भरात तिला लाकडी खुंट्याने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. उपचारासाठी नेताना ‘बाथरूममध्ये पडली’ असे सांगण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र शवविच्छेदनात मारहाणीचे स्पष्ट पुरावे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. मृत मुलीची आई प्रीती भोसले यांनी स्वतःच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली असून न्यायालयाने आरोपी वडिलांना २४ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेने अनेक गंभीर प्रश्न समोर आणले आहेत. शिक्षणाच्या नावाखाली तयार झालेला टेंशनचा तणाव, गुणवत्तेचा ताण, पालकांच्या आकांक्षांचा अतिरेक आणि त्या ओझ्याखाली दबलेली मुलांची कोवळी मनं – हे आजचे वास्तव अधोरेखित करते. एक शिक्षकी वाचन असलेला बाप जर इतक्या अमानवी पातळीवर जाऊ शकतो, तर बाकी समाजाकडून काय अपेक्षा ठेवायची? मुलगा-मुलगी यांच्यातील बौद्धिक स्पर्धा, गुणांवरून ठरवली जाणारी यशस्वितेची व्याख्या, आणि कौटुंबिक प्रतिष्ठेचा भार मुलांच्या खांद्यावर टाकण्याची संस्कृती – यांचा वेध घेणं अत्यावश्यक आहे. ही घटना फक्त एका घरातील नव्हे, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतील दडपणाचे प्रतीक बनली आहे. शिक्षक असलेला एक बाप जर एवढा अंध झाला असेल, तर त्याच्यासारख्या इतर हजारो पालकांची मानसिकता वेगळी असेल का? हे आत्मपरीक्षणाचे प्रसंग आहेत. शिक्षण म्हणजे केवळ गुण मिळवणे नव्हे, हे आपण विसरतो आहोत. डॉक्टर, इंजिनीयर, आयएएस या समाजमान्य व्याख्यांनी मुलांच्या स्वप्नांना अडगळीत टाकले आहे. मुलांचं मन ऐकण्याऐवजी, त्यांना आकडेवारीत घालून मोजण्याची ही समाजाची दुर्दैवी पद्धत आहे. शासनाने मुलांच्या मानसिक आरोग्याची, पालकांसाठी सेंसिटायझेशन कार्यक्रमांची व शिक्षकांसाठी मूल्याधिष्ठित प्रशिक्षणांची योजना तातडीने राबवावी, हीच या दुर्दैवी घटनेतून उगम पावलेली अपेक्षा असावी. अन्यथा असे मृत्यू फक्त आकडे बनून राहतील आणि आपली संवेदनशीलता ही शून्याच्या जवळ पोचलेली ही नोंद होत राहील.

साधनाची साधना अर्धवट राहिली, आणि ही शोकांतिका आपल्या सर्वांना विचार करायला भाग पाडते. तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न, तिची मेहनत आणि तिच्या कुटुंबाच्या आशा एका क्षणात उद्ध्वस्त झाल्या. या घटनेतून आपण शिकले पाहिजे की, मुलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना प्रेम आणि समजूतदारपणाने मार्गदर्शन करणे किती गरजेचे आहे. साधनासारख्या असंख्य मुलींची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आपली सामाजिक आणि शैक्षणिक व्यवस्था अधिक संवेदनशील आणि सक्षम व्हायला हवी. तिच्या मृत्यूने समाजाला जाग यावी, आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, हीच तिला खरी श्रद्धांजली ठरेल.!

सूचना / Disclaimer:
शेतीमाती, कामाच्या गोष्टी आणि मराठा लग्न अक्षदा या सामाजिक प्लॅटफॉर्म्सवर प्रसिद्ध होणारे लेख, विचार, विश्लेषण व मजकूर हे संबंधित लेखकांच्या वैयक्तिक अभ्यास, वाचन, निरीक्षण, आकलन आणि सामाजिक जाणिवांच्या आधारे मांडलेले असतात.
हे विचार कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा गटाविरुद्ध द्वेष पसरविण्याचा हेतू ठेवून मांडलेले नसून, समाजप्रबोधन व चर्चेला चालना देणे हाच प्रमुख उद्देश आहे.
येथील मजकूर कोणत्याही वादास कारणीभूत ठरू नये, हीच विनंती.
या प्लॅटफॉर्मचा उद्देश सामाजिक जाणीवा समृद्ध करणे व लोकशाही संवादाला प्रोत्साहन देणे आहे.


Disclaimer:
The content, opinions, and articles published on the platforms Sheti-Mati, Kamachya Goshti, and Maratha Lagna Akshada reflect the personal understanding, observations, research, and social awareness of individual writers.
These expressions are not intended to defame or provoke any individual, group, or organization but aim to foster social consciousness and constructive discussion.
The platforms shall not be held responsible for any controversy arising out of in

2 thoughts on “महाराष्ट्र हादरला! परिक्षेत कमी मार्क शिक्षक बापाने घेतला पोरीचा जिव ..

  1. साधनाची साधना अर्धवट राहिली, आणि ही शोकांतिका आपल्या सर्वांना विचार करायला भाग पाडते. तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न, तिची मेहनत आणि तिच्या कुटुंबाच्या आशा एका क्षणात उद्ध्वस्त झाल्या. या घटनेतून आपण शिकले पाहिजे की, मुलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना प्रेम आणि समजूतदारपणाने मार्गदर्शन करणे किती गरजेचे आहे. साधनासारख्या असंख्य मुलींची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आपली सामाजिक आणि शैक्षणिक व्यवस्था अधिक संवेदनशील आणि सक्षम व्हायला हवी. तिच्या मृत्यूने समाजाला जाग यावी, आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, हीच तिला खरी श्रद्धांजली ठरेल.!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top