
पहिला हूं तरी म्हण…🖋️ विठ्ठल कोतेकर, कोल्हापूर
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक विद्वान माणसं वेळोवेळी भेटत असतात. कोण एका विशिष्ट टप्यावर, कोण वळणावर, तर कोण एका छोट्याशा क्षणात आपल्याला आयुष्यभर पुरेल असा धडा शिकवून जातं. हे सगळं घडतंच. पण त्या सल्ल्याला, त्या शिकवण्याला मनापासून ऐकलं गेलं, तर आयुष्य खरंच सोनं होतं. माझ्या वडिलांचं नाव होतं मारुती सखाराम कोतेकर. त्यांचे वडील, म्हणजे माझे आजोबा…