प्रतिष्ठेचा दिखावा की,परंपरेची गमावलेली ओळख? :पटतंय का पहा!

लग्न ही एक पारंपरिक,श्रद्धेची, सांस्कृतिक घटना असावी.
सहजीवनाचं नातं या घटनेतून दृढ होतं.
त्यानिमित्ताने गावाच्या सिमेंबाहेर असलेल्या आमच्या रक्षणकर्त्या खऱ्या खुऱ्या ग्रामदेवताच स्मरण या निमित्ताने केले जातं
. पण शहरातून आलेल्या बॅण्डबाजात, सजावटीत आणि बर्फाच्या गोळ्यांत आमच्या या दैवताचा कुठेतरी विसर पडतो
आणि मला मग आश्चर्य वाटतं — वेशीतल्या मारोतीचं मूळ गावातच नव्हे, तर मांडवापर्यंत कसं आलं?

खरं तर वेशीतल्या मारोतीचं मांडवात येणं’ हे त्या परंपरेच्या गमतीशीर विस्कळीतपणाचं प्रतीक आहे. ✍️
गजानन खंदारे

सध्याच्या स्थितीमध्ये अनेक अनावश्यक गोष्टीतून लग्नाच्या निमित्ताने सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब दिसून येते आहे.लग्न हा एक ट्रेंड बनलाय, फॉलो केला नाही तर आपण खूप मागासलेले आहे असा समज होतो आहे.
लग्नाच्या भरल्या मांडवात स्क्रीनवर प्री-वेडिंगचा गाला वरील मुका नकळत ओठावर जातो.
तेव्हा यातून सामाजिक सभ्यतेच्या नेमक्या कुठल्या जाणीवा समृद्ध होतात?
हल्ली असा प्रश्न कोणालाच पडत नाही.
याच मानसिकतेतुन पारंपरिक विवाह सोहळ्याला काहीतरी ‘व्हायरल’ स्वरूप द्यायचं आणि त्या माध्यमातून चर्चेत यायचं,हेच जणू आजच्या ग्रामीण भागातही प्रतिष्ठेचं साधन झालं आहे.
काल परवा अशीच एक नवरा नवरीची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली.

लग्नाच्या मांडवात म्हणे नवरदेव नवरीने म्हणे ट्रॅक्टरात बसून एन्ट्री केली.

कोरोना काळातही काही प्रसिद्धी पिसाटांनी अशीच सोंग उभी केली होती.
एकीकडे शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबात तरण्या मुलांची लग्न जुळत नाहीत.
जुळली तर ती टिकत नाहीत.
लग्नाच्या मांडवातून ट्रॅक्टर चालवणे, यातून शेती आणि मातीशी खरंच नाळ जोडली जात असेल तर यातून आपली आर्थिक ताकद आणि संस्कृती दाखवायला कुणाचीच हरकत नसावी. किंबहुना ती एक भावनिक अभिव्यक्तीही ठरू शकते.
पण
लग्नाच्या मांडवात ट्रॅक्टर चालवणे ही कृती प्रसिद्धीसाठी, व्हायरल होण्यासाठी केली असेल तर ती खरोखरच उपहासास्पद गोष्ट आहे. शेतकऱ्याचं खरं जीवन हे ट्रॅक्टर चालवणं आहे, पण ते मंडपात नव्हे तर शेतात असावं लागतं!अशा गोष्टींच्या माध्यमातून शेतकरीवर्गाच्या वास्तविक अडचणी झाकोळल्या जातात. ट्रॅक्टर घेऊन एंट्री केली या बातम्या शेतकऱ्यांच्या समृद्धीचे लक्षण सांगतात. वाचणाऱ्यांना वाटतं की शेतकरी फारच बड्या थाटात जगत आहेत. असं समज शासन धोरणे राबवत असताना सरकारचा किंवा राज्य करत्याचा होत असेल तर शेतकऱ्यांना सरकारपुढे हात पसरण्याची गरज नसावी
ट्रॅक्टरवरची एंट्री करताना कॅमेऱ्यासाठी हसणाऱ्या चेहऱ्यांमागे, पुढच्या हंगामासाठी खत विकत घेण्यासाठी उधार मागणारी सावली लपवली जाते का?हे विचारणं जास्त गरजेचं आहे. हा मुद्दा समाजाला आरसा दाखवणारा आहे,अशा कृतीतून आपण आदर्श शोधणार की आडवळणाचा प्रसिद्धीमार्ग, हे ठरवणं आता समाजाच्या सजगतेवर अवलंबून राहणार आहे

चड्डी शिवणारे-मरणोत्तर दिखावे! गजानन खंदारे

लेखनासाठी खास निमंत्रण

“कामाच्या-गोष्टी” या प्लॅटफॉर्मवर आम्ही धार्मिक, सामाजिक, राजकीय व समकालीन विषयांवर वैचारिक लेख प्रकाशित करतो.आपण लेखक, विचारवंत, अभ्यासक असाल आणि आपले विचार समाजापर्यंत पोहोचवू इच्छित असाल, तर आम्ही आपले मनापासून स्वागत करतो.लेखनासाठी सहभाग घ्यायचा असल्यास, कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपले नाव, व्हॉट्सॲप क्रमांक किंवा ई-मेल आयडी लिहा.
आम्ही लवकरच आपल्याशी संपर्क करू.

 चला, विचारांची चळवळ एकत्र उभी करूया!
– कामाच्या-गोष्टी वर चर्चा करू या !

सूचना / Disclaimer:
शेतीमाती, कामाच्या गोष्टी आणि मराठा लग्न अक्षदा या सामाजिक प्लॅटफॉर्म्सवर प्रसिद्ध होणारे लेख, विचार, विश्लेषण व मजकूर हे संबंधित लेखकांच्या वैयक्तिक अभ्यास, वाचन, निरीक्षण, आकलन आणि सामाजिक जाणिवांच्या आधारे मांडलेले असतात.
हे विचार कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा गटाविरुद्ध द्वेष पसरविण्याचा हेतू ठेवून मांडलेले नसून, समाजप्रबोधन व चर्चेला चालना देणे हाच प्रमुख उद्देश आहे.
येथील मजकूर कोणत्याही वादास कारणीभूत ठरू नये, हीच विनंती.
या प्लॅटफॉर्मचा उद्देश सामाजिक जाणीवा समृद्ध करणे व लोकशाही संवादाला प्रोत्साहन देणे आहे.


Disclaimer:
The content, opinions, and articles published on the platforms Sheti-Mati, Kamachya Goshti, and Maratha Lagna Akshada reflect the personal understanding, observations, research, and social awareness of individual writers.
These expressions are not intended to defame or provoke any individual, group, or organization but aim to foster social consciousness and constructive discussion.
The platforms shall not be held responsible for any controversy arising out of

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top