झोळी वाले उर्फ योगायोग बाबां -शेवट पहा

एखाद्या संघटनेची बांधणी करताना त्यामागे फक्त नाव, पद किंवा प्रसिद्धीचा मोह नसावा . त्या मागे असतो समाजहिताचा ठाम संकल्प असावा लागतो. निस्वार्थ भावनेचा जाज्वल्य जिव्हाळा आणि इतरांच्या मदतीसाठी तत्पर राहण्याची अखंड ऊर्जा. संघटनेत कार्य करणारी व्यक्ती म्हणजे एक चालतं–बोलतं उदाहरण असतं—ज्याला आपले स्वार्थ बाजूला ठेवून समाजासाठी जगण्याची ओढ असते.परंतु ही वाट तितकी सोपी नसते. एखादी संघटना उभारणं म्हणजे केवळ नाव, पद किंवा प्रसिद्धी मिळवणं नव्हे. तिच्यामागे असतो समाजहिताचा ठाम निर्धार, निस्वार्थ सेवाभावाचा जिव्हाळा आणि इतरांच्या कल्याणासाठी सतत झगडण्याची ऊर्जा. संघटनेत कार्य करणारी व्यक्ती म्हणजे चालतं–बोलतं उदाहरण—स्वार्थापलीकडे जाऊन समाजासाठी जगण्याची ओढ ज्या व्यक्तीत असते, तीच खरी समाजकार्यातील प्रेरणा ठरते.

आज अशा कसोटीवर नेहमीच खरे उतरलेले आमचे सहकारी, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष “शिवाजी कव्हर ” यांचा जन्मदिवस. त्यांचा दिवस म्हणजे केवळ एक तारीख नाही, तर समाजासाठी प्रेरणा घेण्याचा क्षण आहे.आजचा दिवस

आजचा हा दिनविशेष एक वेगळीच प्रेरणा आणतो कारण आजच प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मदिन—प्रेरणा दिवस देखील आहे. विवेक, प्रबोधन आणि समाजजागृतीची ठिणगी पेटवणाऱ्या या थोर विचारवंताने जे बीज रोवलं, त्यातून पिढ्यानपिढ्या धैर्य, समजूत आणि जिद्द घेऊन जगत आहेत. प्रेरणास्थान प्रेरणा दिवस 👉🏻

“समाज परिवर्तनाची अखंड मशाल – प्रबोधनकार ठाकरे!”

पण हाच दिवस दुसऱ्या अर्थाने एका विरोधाभासालाही सामोरा जातो.

हा योगायोग दिवस देखील आहे. योगायोगानेच “झोळीवाले नबाब”—जे नेहमी क- बाबांच्या निमित्ताने विदेश दौऱ्यावर रममाण असतात—ते आज स्वदेशात आहेत आणि त्यांचाही जन्मदिवस आहे. भक्तगण त्यांचा दिवस श्रद्धेने साजरा करत आहेत. मात्र, आमच्यासाठी विचारांच्या नात्याला बळ देणारा हा दिवस वेगळाच आहे. कारण, “शिवाजी कव्हर “यांचा जन्मदिवस हा आमच्यासाठी “योगायोगाचा” दिवस नसून, तो आमच्या मनातील अभिमानाचा, प्रेरणेचा आणि उत्साहाचा दिवस आहे.त्यांच्या कार्यामुळे समाजात विचारांचा दीप प्रज्वलित होतो आहे. संघटनेच्या माध्यमातून एकजूट, सेवा आणि संस्कार यांची जपणूक होत आहे. म्हणूनच, आजचा दिवस हा केवळ दिनदर्शिकेतील जन्मदिन नाही तर आमच्या सहकार्‍याचा कौतुकाचा दिवस आहे—एक खऱ्या समाजसेवकाच्या कार्याचा सन्मान करण्याचा दिवस.

गजानन खंदारे

संभाजी ब्रिगेड प्रवक्ता

Disclaimer
वाढदिवस साजरे करणे किंवा व्यक्तीपूजा करणे हे आमच्या तत्त्वात बसत नाही.
मात्र, चांगल्या व्यक्तीच्या चांगल्या कार्याचा गौरव करणे आणि त्यातून प्रेरणा घेणे हा या लेखाचा मूळ उद्देश आहे.
हे लिखाण केवळ कार्याचा सन्मान करण्यासाठी आहे, व्यक्तिपूजेच्या हेतूने नव्हे.तसें जाणवल्यास हा योगायोग बाबाचा योगायोग समजावा

“खालच्या कमेंट बॉक्समध्ये टाळी किंवा थाळी वाजवायला ना श्रम लागतात, ना पैसा; पण श्रद्धेने वाजवलेली टाळी मात्र खरं पुण्य मिळवून देते.”आपलाच झोळी वाले उर्फ योगायोग बाबा

One thought on “झोळी वाले उर्फ योगायोग बाबां -शेवट पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top