राक्षस कुळातील माझी आई..! अवताराच्या गोष्टी सांगायची पुन्हा पुन्हा..
माझी “आई” ही जुनी नववी पर्यंत शिकलेली पोथी, पुराण कथात ती डोकं खुपसून बसायची.ती खूपच “देवभोळी” होती असं नाही,पण “परोपकार ते परपीडा” या विचाराभोवती“देव आणि दानव” या “अवताराच्या” कथा मला ती लहानपणी नेहमी सांगायची.तेव्हा यांचा खरा आशय मला कळत नव्हता.पण, आपणही हातात शस्त्र घेऊन या राक्षसाचा संहार करावा असं मला नेहमी वाटायचं.तेव्हा आई मला घट्ट…
लोढाईच्या माळावर: गर्दीचा बाजार!
अश्विन शुद्ध नवमीला मी लोढाईच्या माळावर दर्शनासाठी गेलो होतो. त्या दिवशी इथे दरवर्षी एकदिवसीय मोठी यात्रा भरते. “लोढा-आई”चा माळ म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत ठिकाण – हिरवीगार टेकडी, जंगलाचं कवच आणि सभोवताल पसरलेलं गायरान व जंगल क्षेत्र . इथलं मंदिर हे केवळ दगड-विटांचं बांधकाम नाही, तर ग्रामीण लोक आणि कृषी संस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे….
“दाढीवाल्या बाबाची” खरी खुरी गोष्ट!
आमचा दाढीवाला बाबा : गजानन भोयर 🚩 आजच्या काळात “दाढीवाले बाबा” ही संज्ञा लोकांना दोन अर्थांनी ठाऊक आहे. एक म्हणजे जनतेला स्वप्नं दाखवून फसवणारे, सत्तेसाठी झगडणारे आणि रोज नवे भ्रम पेरत मुर्ख बनवणारे बाबा. दुसरीकडे अध्यात्म, प्रवचनं आणि चमत्काराच्या नावाखाली लोकांच्या श्रद्धेचं शोषण करणारे बाबा.सध्या देशात या बाबांचं अक्षरशः पीक आलंय. झोळी वाल्या फकीर बाबा…
गुलामीचे नवे रूप | “बायकोचा बैल ते सरकारचा बैल “
“…लाडक्या बहिणींना आता लाभासाठी e-kyc करणे बंधनकारक आहे. असे फर्मान सरकार नावाच्या व्यवस्थेने १८ तारखेला भल्या पहाटेच्या शपथ विधी प्रमाणे झोपेतून उठून जारी केले … ”आणि e-पिक पाहणीच्या अप्लिकेशन प्रमाणे हे पोर्टल सर्वर सुद्धा अख्खा ७५० मिली पिऊन झोपल्यागत “बम्पर कोडींग” घालून “ओव्हर लोड” केले . लहान लेकराच्या मुड प्रमाणे आमच्या सरकारला कधी आणि कुठे…
झोळी वाले उर्फ योगायोग बाबां -शेवट पहा
एखाद्या संघटनेची बांधणी करताना त्यामागे फक्त नाव, पद किंवा प्रसिद्धीचा मोह नसावा . त्या मागे असतो समाजहिताचा ठाम संकल्प असावा लागतो. निस्वार्थ भावनेचा जाज्वल्य जिव्हाळा आणि इतरांच्या मदतीसाठी तत्पर राहण्याची अखंड ऊर्जा. संघटनेत कार्य करणारी व्यक्ती म्हणजे एक चालतं–बोलतं उदाहरण असतं—ज्याला आपले स्वार्थ बाजूला ठेवून समाजासाठी जगण्याची ओढ असते.परंतु ही वाट तितकी सोपी नसते. एखादी…
१० मिनिटांत आयुष्य संपवणारा;अचानक मृत्यू का वाढतोय?
“मरण दाराशी आले, त्याला म्हणतो. ये तुला १०० वर्ष आयुष्य आहे. आणि मग मरणही चाट पडतं, म्हणाले काय हा मनुष्य आहे !” अशीच काहीशी आपली जगण्याची आणि वागण्याची अवस्था झाली आहे .माणसे ,तरुण ,विद्यार्थी स्त्रिया चालता बोलता मृत्युच्या दारात जात आहेत .आपण मात्र त्याला अजूनही हलक्यात घेतो आहे.” मृत्यू इतक्या सहजपणे दार ठोठावतो आहे. कि…
आकाशाला भिडताना…
✍🏻. गजानन खंदारे आकाशात झेप घेण्यापूर्वी बेंगळुरू विमानतळावरून माझ्या मुलाचा फोन आला.“पप्पा, पुढील काही वेळ मी हवेत असणार. फोन फ्लाइट मोडवर राहील.”मी पुढचं काही बोलणार, एवढ्यात फोन कट झाला. माझा मुलगा पहिल्यांदाच विमानप्रवास करत होता, आणि त्याच्या या यशाचा मला मनस्वी अभिमान वाटत होता. त्याच्या डोमेस्टिक क्लासची व्यवस्था केली होती. तरीही, त्याच्या या वाक्याने मला…
१० वर्षांचा राजकीय हनिमून पिरिअड म्हणजे काय? | सविस्तर विश्लेषण
सार्वजनिक जीवनातला “हनिमून पिरिअड” फार तर आठवडा किंवा दोन आठवडे, कधी कधी महिनाभर चालतो.नंतर लगेच समर्थपणे कुटुंबाची जबाबदारी उचलायला ते जोडपं सिद्ध होतं. आता हे तत्व राजकारणात लागु पडेलच असे नाही.पण आमच्या सरकारचा “राजकीय हनिमून पिरिअड” दहा वर्षे उलटूनही संपायचे नावच घेत नाही.लग्नाच्या सात वर्षांनंतर नवरा बायकोचे नाते कधी सोन्यासारखे चमकते, तर कधी किरकोळ भांडणे…
“लोकशाही व्यवस्थेला बाजारात मांडणारे” मराठ्यांचे आंदोलन ! :एक संदर्भ
असं म्हणतात की “पॉलिटिक्स इज द गेम ऑफ स्काउंड्रल्स” म्हणजेच राजकारण हा बदमाशीचा खेळ असतो. बदमाशी ही राजकारणाची उपजत खूण आहे हे मान्य केलं, तरी जेव्हा ही बदमाशी कारस्थानीपणात, कपटी डावपेचात रूपांतरित होते, तेव्हा ती लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक ठरते. आज आपण पाहतोय की शिवसेनेची फोड झाली, राष्ट्रवादीची दोन शकले झाली, आणि या सगळ्यात म्हत्वाचे म्हणजे…
गौरी पूजनाचे बदलते स्वरूप : नेमका संदर्भ काय?
वाशिम पासून जवळच असलेल्या तामसी येथील शिवाजी कव्हर व सौं किरण कव्हर हे दमपत्ती गेली अनेक वर्ष अनावश्यक धार्मिक प्रथेला फाटा देऊन घरात गौरी ऐवजी जिजाऊ सावित्री पूजन करून ग्रंथ पूजन करतात. हे बदलते स्वरूप नेमके आपल्या संस्कृती परंपरेला धरून आहे कि विरोधात याबाबत या लेखातून केलेला हा थोडक्यात उहापोह हे करत असताना आपल्या मूळ…
