
प्रतिष्ठेचा दिखावा की,परंपरेची गमावलेली ओळख? :पटतंय का पहा!
लग्न ही एक पारंपरिक,श्रद्धेची, सांस्कृतिक घटना असावी.सहजीवनाचं नातं या घटनेतून दृढ होतं. त्यानिमित्ताने गावाच्या सिमेंबाहेर असलेल्या आमच्या रक्षणकर्त्या खऱ्या खुऱ्या ग्रामदेवताच स्मरण या निमित्ताने केले जातं. पण शहरातून आलेल्या बॅण्डबाजात, सजावटीत आणि बर्फाच्या गोळ्यांत आमच्या या दैवताचा कुठेतरी विसर पडतो आणि मला मग आश्चर्य वाटतं — वेशीतल्या मारोतीचं मूळ गावातच नव्हे, तर मांडवापर्यंत कसं आलं?…