मेल्यावरही पोचवण्याची घाईच? नऊ तासांचा प्रवास आणि मनाचे ओझे ! ✍️ गजानन खंदारे
अलीकडे रोजच मरणाच्या बातम्या आणि घटना आपल्या कानावर येत राहतात. त्याचे दुःख आता मनाला भिडण्याऐवजी केवळ शब्दांतच अधिक उतरते आहे, असे मला वाटत असतानाच परवा माझे सासरेबुवांच्या अचानक जाण्याची बातमी आली.जेव्हा नात्यातील एखादी जवळची व्यक्ती अशी अचानक सोडून जाते, तेव्हा त्या नात्यातील परस्पर संवादाच्या खोलीवरच दुःखाचा गहिवर ठरत असतो.बायको पुण्यात असताना तिला ही घटना…
