#नंदादीप_विझलाय#आकाशी_धूर_तेवढा_दिसतोय
घास भरवत-भरवत उंच आकाशी गगन भरारी घेण्यासाठी ज्या चिल्या-पिल्यांच्या पंखांना बळ दिले. तीच चिली-पिली जेव्हा वयोवृद्ध आई-वडिलांना नाकारायला लागतात. किंबहुना लाथाडायला देखील लागतात. अशा अगतिक, असहाय आणि अनाथ व्यक्तींच्या जीवनातील सल म्हणजे समाजमनावरील भळभळती जखम!! जी या नटसम्राटाने अचूकपणे मांडली. नटसम्राट रंगवताना नानांनी आपल्या सशक्त अभिनयातून जशी डॉ.श्रीराम लागू यांची प्रकर्षाने आठवण करून दिली.तशी त्यांनी…
