💬 WhatsApp ग्रुप जॉइन करा

भंडार-दऱ्याच्या वाटेवर नेमकं ….?

सप्टेंबर 2026… शनिवार … शिक्षक दिनाची सकाळची शाळा आटोपून घरी आलो. रोजच्या दिवसासारखाच दिवस होता. शाळेतील काम, विद्यार्थ्यांची लगबग आणि त्यानंतर घरी परतण्याची घाई. तेवढ्यात कव्हर सरांचा फोन आला….चला, कुठेतरी जाऊ….अचानक आलेल्या त्या वाक्याने दिवसाचा सगळा मूडच बदलला….कुठे? ते नंतर ठरवू. आधी निघूया….काही वेळात बोरकर सरांशी कॉन्फरन्सवर बोलणं झालं. बिल्लारी सर, कावरखे सर आणि आणखी…

Read More

तहसीलदाराच्या एका रीलचा नेमका अपराध ?

सोशल मीडियाच्या जगात एखाद्या व्यक्तीची प्रतिमा तयार व्हायला फार वेळ लागत नाही आणि ती बदलायलाही फार वेळ लागत नाही. पण प्रशासनातील एखाद्या अधिकाऱ्याबाबत हे घडत असेल, तर त्याकडे थोडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांची ‘खुर्चीच’ सध्या एका रीलमुळे चर्चेत आली आहे. कार्यालयात प्रवेश करणे, खुर्चीवर बसणे, लाभार्थ्याची फाईल हाताळणे यासारखी कार्यालयीन दृश्ये…

Read More

“सहजीवनाच्या गद्दे पंचविशीत ” ती ..आणि माझ्या प्रेमाची गोष्ट !

पती-पत्नीचं नातं हे केवळ नवरा-बायकोचं नातं नसतंच मुळी; ते खऱ्या अर्थाने परस्पर सहजीवनाचं नातं असतं. म्हणूनच हे नातं जगाला दाखवायचं नसतं, तर मनापासून जपायचं असतं. स्त्रीत्वाचा सन्मान म्हणून वाशिम येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही सत्यशोधक मंडळींनी आपापल्या पत्नीचे चरणस्पर्श करून दर्शन घेतले, तेव्हा त्यावेळी समाजधुरीणांनी आमची बरीच चेष्टा केली होती. ​लग्नानंतर नव्या नवलाईचे दिवस संपतात,…

Read More

श्रीकृष्ण देव नव्हे: कर्मकांड नाकारणारा खराखुरा कृषीपालक

​जन्माष्टमीचा सण येतो तेव्हा संपूर्ण देश एका वेगळ्याच भक्तीभावात बुडून जातो. मंदिरांमध्ये होणारी आरास, उपवास, रात्रीचा जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी फोडली जाणारी दहीहंडी या धार्मिक चौकटीतच आपण सहसा श्री कृष्णाला पाहत आलो आहोत. पण या विधी आणि उपवासाच्या पलीकडे जाऊन पाहिले, तर समोर येतो मातीशी, गुराढोरांशी आणि शेतजमिनीशी घट्ट नाळ जोडलेला एक खराखुरा लोकनायक. श्रीकृष्ण…

Read More

आपण खरंच धार्मिक होत आहोत की,फक्त धार्मिक दिसत आहोत?

हल्ली कुठल्याही मंदिरात गेलं की दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात.त्यातचश्रावण महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळीच भक्तीची धार्मिकता जाणवू लागते. खरं तर श्रावण महिन्याची ओळखच ही “भक्तीमास” म्हणून आहे.शिवाची उपासना मोठ्या आस्थेने केली जाते.जागोजागी कावड मंडळांची लगबग दिसते. भगवे झेंडे, डीजे, घोषणा, मिरवणुका आणि भक्तांची गर्दी रस्त्यावर दिसू लागते.दिंडी आणि वारी ही केली जातेमंदिरांमध्ये दर्शनासाठी…

Read More

मराठा सेवा संघाच्या ३६ वर्षांच्या प्रवासाकडे आज नव्याने पाहण्याची गरज आहे का?

एक सप्टेंबर 1990 रोजी अकोला येथे आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन मराठा सेवा संघ या सामाजिक चळवळीची स्थापना केली . चळवळ ही समाजाच्या विकासासाठी विचार पुरवणारे माध्यम असते . कोणत्याही सामाजिक परिवर्तनवादी चळवळीचे मानव कल्याण हेच अंतिम उद्दिष्ट असायला हवे . अन्यायाची जाणीव निर्माण करणे , अन्यायग्रस्तांना संघर्षासाठी प्रेरित करणे ,…

Read More
Back To Top