💬 WhatsApp ग्रुप जॉइन करा

या योजनेत लाभार्थ्यांना ८ लाख ५३ हजार ९१५ रुपये पर्यंत शासकीय अनुदान

शासनाने या प्रकल्पाची एकूण किंमत ११ लाख ३८ हजार ५५४ रुपये इतकी निश्चित केली असून, त्यात जनावरांच्या खरेदीपासून ते गोठा व सोलरपर्यंतचा खर्च समाविष्ट केला आहे. यामध्ये प्रति शेळी १२ हजार आणि प्रति बोकड १५ हजार रुपये या दराने ५० शेळ्या व ५ बोकडांसाठी ६ लाख ७५ हजार रुपये गृहीत धरले आहेत. सोबतच पक्क्या गोठ्याच्या बांधकामासाठी २ लाख रुपये, ३ किलोवॅट सोलर संचासाठी १ लाख ३२ हजार रुपये, कडबा कुट्टी यंत्रासाठी ३० हजार रुपये आणि ३ वर्षांच्या पशुविम्यासाठी १ लाख १ हजार ५५४ रुपये इतका खर्च निश्चित केला आहे. खरेदी करावयाच्या शेळ्या किंवा मेंढ्या १ ते ३ वर्षे वयोगटातील असणे बंधनकारक आहे. राज्यात सर्वत्र असे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे.त्यातच ग्रामीण भागात रोजगार उरलेला नाही. त्यादृष्टीने सरकारने आपल्यासाठी एक महत्त्वाची योजना जाहीर झालेली आहे. आणि या योजनेसाठी अर्जाची नोंदणी सुद्धा सुरू झालेली आहे.


ग्रामीण भागातील कष्टकरी माणूस, शेतकरी, महिला बचत गट आणि तरुणांना केंद्रस्थानी ठेवून शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे तुमच्याकडच्या कष्टाचं रूपांतर थेट मोठया उत्पन्नात होऊ शकतं. पण यात एक छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची अट आहे… जी पूर्ण केल्याशिवाय तुम्ही या प्रक्रियेत पुढे जाऊच शकत नाही. ती अट नेमकी काय आहे? आणि ही योजना नेमकी कोणती आहे?

राज्यातील अल्पभूधारक शेतकरी, पशुपालक आणि महिला व ग्रामीण तरुणांना स्वतःचा शेळी किंवा मेंढी पालन व्यवसाय उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता अभियान’ सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत ५० शेळ्या किंवा मेंढ्या आणि ५ बोकड या प्रकल्पासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५ लाख ६९ हजार २७७ रुपये , तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ८ लाख ५३ हजार ९१५ रुपये पर्यंत शासकीय अनुदान मिळणार आहे. २६ नोव्हेंबर २०२६ पासून महाडीबीटी २.० पोर्टलवर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे
त्याचीच हि माहिती


याबाबतची सविस्तर आणि थोडक्यात घेऊ ही योजना नेमकी कुणासाठी आहे तर शेतकरी,शेतमजूर, भूमिहीन,दिव्यांग , महिला बचत गटाच्या सदस्य असाल किंवा वनहक्क धारक असाल… प्रत्येकासाठी यात खास तरतूद आहे. अगदी तुमच्याकडे प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र नसेल, तरीही तुमच्या साठी अशी फायदेशीर संधी क्वचितच समोर येते. ही योजना आहे महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. ग्रामीण भागात पशुपालन, दुग्धव्यवसाय, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन किंवा वराहपालन यांसारख्या जोडधंद्यांना चालना देऊन शेतकरी आणि तरुणांना गावपातळीवर स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी शासनाने या योजनेचा मोठा शासन निर्णय जारी केला आहे. याअंतर्गत ठरवून दिलेल्या प्रकल्पाच्या खर्चावर सर्वसाधारण म्हणजे जनरल प्रवर्गासाठी पन्नास टक्के आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत भरघोस अशी अनुदानाची तरतूद केली आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी आधी नीट समजून घ्या.
यासाठी
तुम्हाला आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र आणि डोमिसाईल म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र लागेल. जमिनीसाठी सातबारा उतारा, आणि स्वतःची जमीन नसेल तर पाच वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा करारनामा लागू असल्यास लागतो. वनहक्क धारकांसाठी वनहक्क प्रमाणपत्र किंवा सातबारावरील नोंद आवश्यक असते. पशुपालन किंवा दुग्धव्यवसाय प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र, ते नसेल तर प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमीपत्र किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे अनुभव प्रमाणपत्र लागते. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी यूडीआयडी प्रमाणपत्र, महिला बचत गटासाठी सदस्यत्व प्रमाणपत्र, सोबत बँक पासबुक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो तयार ठेवा. महत्त्वाचे म्हणजे अर्ज प्रक्रियेसाठी महासारथी आयडी किंवा महाआयडी आणि फार्मर आयडी यांसारखी डिजिटल ओळख तयार असणे गरजेचे आहे आणि बँक खाते आधार संलग्न व डीबीटी सक्रिय असावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top