💬 WhatsApp ग्रुप जॉइन करा

चौकट मोडून… मुलगी जगताना! जन्मापासून आजच्या जन्मदिवसापर्यंत…

प्रचलित पद्धतीने आम्ही कधीच वाढदिवस साजरे करत नाही.तरी पण औपचारिकता पाळाव्याच लागतात. मात्र काही दिवस असे असतात, जे केवळ उत्सवाचे नसतात, तर आयुष्याच्या प्रवासाकडे मागे वळून पाहण्याचे असतात.आणि हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात ठरलेलाच असतो.२४ ऑगस्ट १९९८ रोजी माझी मुलगी प्राजक्ता उर्फ अश्विनी हिचा जन्म झाला.त्या काळातील सामाजिक परिस्थिती आजच्यासारखी नव्हती. मुलीचा जन्म हा फारसा कौतुकाचा…

Read More

देणाऱ्याने काय द्यावे … विंदा

“हिरव्या पिवळ्या माळावरून, हिरवी पिवळी शाल घ्यावी;सह्याद्रीच्या कड्यावरून, छातीसाठी ढाल घ्यावी.” विंदाची ही कविता आजही अनेकांच्या स्मरणात आहे..विंदा करंदीकर यांचा आज जन्मदिवस! करंदीकर यांनी मराठी कवितेला नवे विषय, नवी भाषा आणि नवी अभिव्यक्ती दिली. त्यांच्या कवितेत संवेदनशीलता होती, पण त्याचबरोबर तर्क, विद्रोह, सामाजिक भान आणि जीवनाकडे पाहण्याची स्वतंत्र दृष्टीही होती. वेड्या पिशव्या ढगांकडून वेडेपिसे आकार…

Read More

श्रीयाळशेठ की सक्रोबा !मग हा नेमका कोण?

आपल्या लोकसंस्कृतीची विशेषता कृषी संस्कृतीची पाळमुळे खूप खोलवर अशी रुजलेली दिसतात.ती अनेक अगांनी विस्तारत जाते. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा सक्रोबा हा सण या पैकीच आहे.महाराष्ट्राच्या ग्रामीण लोकसंस्कृतीतील एक वैशिष्ट्यपूर्ण सण आहे. याला प्रदेशानुसार श्रीयाळ षष्ठी, शिराळ षष्ठी, श्रीयाळशेठ, संकरोबा, शंकरोबा किंवा भुलोबा अशी वेगवेगळी नावे आढळतात. “नागपंचमी सरली, आला साक्रोबाचा सण, माहेराच्या आठवणीनं भरून…

Read More

‘नवसाला पावणारा देव : चमत्काराचे वास्तव की मानसिकतेचे थोतांड!’

✍️ गजानन खंदारे समाजात देवाला “नवस” बोलण्याची परंपरा फार जुनी आणि खोलवर रुजलेली आहे. “देवाला नवस बोलला आणि तो पूर्ण झाला” म्हणजे देव पावला अशा असंख्य कथा, आख्यायिका आणि अनुभव आपण सतत ऐकत आलो आहोत.या अशा कथातुन नवसाला पावणारे अनेक देव जन्माला आलेत. किंवा घातले गेलेत अनेक देव, देवस्थाने आणि चमत्कार प्रसिद्ध झाले. अनेक ठिकाणांची…

Read More

तेव्हा देव कुठे होता ? तर स्मशानातल्या त्या दोन मुस्लिमां हातून , भडाग्नी देत होता ..!!

अल्बम चाळताना अचानक हा फोटो समोर आला…आणि डोळ्यासमोर उभा राहिला तो काळ – भीतीचा, असहायतेचा, आणि माणुसकीची खरी परीक्षा घेणारा…लॉकडाऊनचा तो भयानक काळ…जिथे जिवंत माणूस माणसाला घाबरत होता…जिथे नाती, रक्ताची असोत किंवा जिव्हाळ्याची – सगळी दूर पळाली होती…मृत्यू इतका जवळून फिरत होता की प्रत्येक श्वास भीतीने भरलेला होता…लोक पटापट मरत होते…स्मशानभूमीत प्रेतांचा ढीग लागत होता…आणि…

Read More

पी. एस. खंदारे : मला बुद्ध सांगणारा गाडगेबाबा हरपला…!

– गजानन खंदारे मोप (रिसोड) इथल्या संवेदनाहीन सरकारी व्यवस्थेने सुमारे १४ हजार सरकारी शाळा बंद करण्याचा घाट घातला होता. माझ्यासह अनेक सहकारी मित्र व्यथित झाले होते. आम्ही काही जण सरकारशी दोन हात करण्याची भाषा करत होतो; तसेच नियोजनही सुरू होते. शेवटी ८ जानेवारी २०२३ ही तारीख निश्चित झाली. शाळा आणि शिक्षण वाचवण्यासाठी आम्ही अक्षरशः धावपळ…

Read More

“चंपा” च्या मेंदूची ‘फॉरेन्सिक क्रांती’ : आणि नोबेलची शिफारस

​ ✍️ गजानन खंदारे आपला भारत देश आता निर्विवाद जागतिक महासत्ता बनला आहे, यासाठी आणखी कोणतीही सिद्धता किंवा पुरावा देण्याची गरज उरलेली नाही. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात “चंपा”सारखे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आपले अवतारकार्य पुढे नेत असताना आपण सर्वच धन्य झालो आहोत!अलीकडेच दिल्लीत काही तरुणांनी आंदोलन केले. त्या संदर्भात “चंपा” यांनी एक विधान केले – त्यांच्या…

Read More
Back To Top