माझ्या बापाची वारसा-भेट
✍️ गजानन खंदारेआज वाऱ्याने आपला प्रवाह जरा बदलला होता.कधी मंद, तर कधी अचानक झंझावातासारखा उसळत तो स्वतःभोवती गिरक्या घेत धुळीचे लोट उडवत होता.तरीही रणरणत्या उन्हात मृगजळाचे पाट स्पष्ट वाहताना दिसत होते.अवतीभवतीच्या कडक उन्हाला तोंड देत माझा बाप मात्र अजूनही चालतच होता…उन्हाची पारग वेळ केव्हाच टळून गेली होती.त्याच्या अंगात आता त्राण, अवसान—काहीच उरले नव्हते.सळसळणारं रक्तही जणू…
