देणाऱ्याने काय द्यावे … विंदा

“हिरव्या पिवळ्या माळावरून, हिरवी पिवळी शाल घ्यावी;
सह्याद्रीच्या कड्यावरून, छातीसाठी ढाल घ्यावी.”

विंदाची ही कविता आजही अनेकांच्या स्मरणात आहे..विंदा करंदीकर यांचा आज जन्मदिवस! करंदीकर यांनी मराठी कवितेला नवे विषय, नवी भाषा आणि नवी अभिव्यक्ती दिली. त्यांच्या कवितेत संवेदनशीलता होती, पण त्याचबरोबर तर्क, विद्रोह, सामाजिक भान आणि जीवनाकडे पाहण्याची स्वतंत्र दृष्टीही होती.

वेड्या पिशव्या ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे.

रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे..

अशा ओळींतून त्यांच्या कवितेतील मातीशी असलेले नाते आणि जगण्याची उर्मी जाणवते.

विंदांचे साहित्य आजही वाचकाला केवळ आनंद देत नाही, तर विचार करायला भाग पाडते. म्हणूनच त्यांचा साहित्यिक वारसा काळाच्या पुढे जाणारा आहे.

देणाऱ्याने देत जावे,घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे..-

याचा आपण सोई नुसार अन्व्यार्थ लावला .ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित या थोर साहित्यिकाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top