श्रीयाळशेठ की सक्रोबा !मग हा नेमका कोण?

आपल्या लोकसंस्कृतीची विशेषता कृषी संस्कृतीची पाळमुळे खूप खोलवर अशी रुजलेली दिसतात.
ती अनेक अगांनी विस्तारत जाते. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा सक्रोबा हा सण या पैकीच आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण लोकसंस्कृतीतील एक वैशिष्ट्यपूर्ण सण आहे. याला प्रदेशानुसार श्रीयाळ षष्ठी, शिराळ षष्ठी, श्रीयाळशेठ, संकरोबा, शंकरोबा किंवा भुलोबा अशी वेगवेगळी नावे आढळतात.

“नागपंचमी सरली, आला साक्रोबाचा सण,
माहेराच्या आठवणीनं भरून आलं मन…



डॉ. सरोजिनी बाबर यांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आणि सण-उत्सवांवर लिहिलेल्या ”महाराष्ट्राचे लोकसाहित्य’ सारख्या अनेक पुस्तकात ओघात येणाऱ्या या लहान-सहान व्रतांचा आणि साक्रोबाचा उल्लेख दिसतो .

या सणाचे मूळ श्रीयाळ श्रेष्ठ या दानशूर शिवभक्ताच्या पुराणातील लोककथेशी जोडले जाते. लोकपरंपरेनुसार दुष्काळाच्या काळात श्रीयाळ श्रेष्ठ यांनी आपली धान्याची कोठारे रयतेसाठी खुली केली आणि लोकांना अन्नधान्याची मदत केली. त्यांच्या या दानशूरतेच्या स्मरणार्थ श्रावण शुद्ध षष्ठीला हा उत्सव साजरा करण्याची परंपरा रूढ झाली, अशी कथा सांगितली जाते. ती कितपत खरी खोटी या वादात न पडता याला दानत वृत्तीचे प्रतिक मानायला हरकत नसावी .

काही भागांत माती, बांबूच्या कामट्या आणि धान्य वापरून सक्रोबासाठी छोटासा राजवाडा किंवा हवेली तयार करण्याची परंपरा आहे. त्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी यांसारख्या धान्यांचा वापर केला जातो. त्यामुळे हा सण केवळ धार्मिक विधी न राहता शेती, अन्नधान्य, समृद्धी आणि ग्रामीण जीवनाशी जोडलेला लोकउत्सव बनतो. जिवनाश्यक म्हणून धन धान्य हेच खर लोकजीवनाच्या समृद्धीचे प्रतिक आहे .

यामुळे सक्रोबा सणाकडे ‘स्त्रियांनी जपलेली श्रावणी लोकसंस्कृती’ या दृष्टिकोनातून पाहणे खूप सुंदर ठरेल . नागपंचमीच्या दिवशी माहेरी आलेल्या लेकी-सुना, दुसऱ्या दिवशीचा सामूहिक उत्सव, फेरातील गाणी-ओव्या, झिम्मा-फुगडी आणि सामूहिक पूजा—या सगळ्यातून ग्रामीण स्त्रीजीवनातील आनंद, माहेरपण, स्नेह आणि सामुदायिकता व्यक्त होते

आजच्या आधुनिक काळात अनेक जुन्या परंपरा विस्मृतीत जात आहेत. पण अशा सणांमधून आपल्या पूर्वजांची विचारसरणी आणि लोकसंस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते.

चला ग सख्यांनो, साकरोबा पूजू या,
मातीच्या देवाला साखरेचा नैवेद्य दाखवू या…
नागपंचमी सरली, साकरोबा आला,
माहेरच्या आठवणीने जीव माझा सुखावला!

अशाच अन्य मजकुरासाठी आम्हाला येथे क्लिक करूफालो करा

माहेरची ओढ आणि साकरोबा (अहिराणी/खानदेशी)

साकरोबाना दिन आला, माहेरनी याद येई,
भाऊ माझा येईल, म्हाले माहेरले लेई…
साखरेनी पाटी, डोक्यावर धरली,
साकरोबा देवा तुनी कृपा म्हार्यावर राहिली!

छायाचित्रे @ kamachya-goshti.com

सरकार वेगवेगळ्या योजना जाहीर करतं, लाभासाठी पात्रता आणि निकष ठरवतं.. मग ते चुकीचे आहेत बरोबर आहेत, योग्य आहेत,अयोग्य आहेत किंवा खरच त्याची गरज आहे का?

याबाबत कोणी प्रश्न उभे करत नसतो.काखेतलं काढायचं आणि बाजारात मांडायचे! आता लाडक्या बहिणीची kyc चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे 92 लाख महिला भगिनी अपात्र ठरल्या.कर्ज माफिचे सुद्धा असंच होऊ शकतं, घाईत चुकीच्या ठिकाणी किंवा पद्धतीने प्रक्रिया झालेली असू शकते.या साठी जवळच्या आपले सरकार केंद्रात जाऊन पडताळणी करू शकता.मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना उद्यापासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे !यासाठी महा आय डी नोंदणी आवश्यक असल्याचे सांगितले जाते.इतर योजना साठी सुद्धा हा डिजिटल फतवा आवश्यक आहे.तेव्हा लाडक्या बहिणी, भाऊ,  शाळेतील, शाळेबाहेरील सर्वांनीच आपली डिजिटल ओळख निर्माण करायला हरकत नसावी.

.आपले सरकार आपली ओळख @कामाच्या-गोष्ठी

प्रस्तुत लेखातील माहिती ही लोकपरंपरा, मौखिक लोकसाहित्य आणि प्रादेशिक समजूतींवर आधारित आहे. विविध भागांनुसार साकरोबा सणाची पूजा पद्धत आणि लोकगीतांमध्ये स्थानिक बदल असू शकतात.

;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top