💬 WhatsApp ग्रुप जॉइन करा

तहसीलदाराच्या एका रीलचा नेमका अपराध ?

सोशल मीडियाच्या जगात एखाद्या व्यक्तीची प्रतिमा तयार व्हायला फार वेळ लागत नाही आणि ती बदलायलाही फार वेळ लागत नाही. पण प्रशासनातील एखाद्या अधिकाऱ्याबाबत हे घडत असेल, तर त्याकडे थोडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांची ‘खुर्चीच’ सध्या एका रीलमुळे चर्चेत आली आहे. कार्यालयात प्रवेश करणे, खुर्चीवर बसणे, लाभार्थ्याची फाईल हाताळणे यासारखी कार्यालयीन दृश्ये…

Read More

“सहजीवनाच्या गद्दे पंचविशीत ” ती ..आणि माझ्या प्रेमाची गोष्ट !

पती-पत्नीचं नातं हे केवळ नवरा-बायकोचं नातं नसतंच मुळी; ते खऱ्या अर्थाने परस्पर सहजीवनाचं नातं असतं. म्हणूनच हे नातं जगाला दाखवायचं नसतं, तर मनापासून जपायचं असतं. स्त्रीत्वाचा सन्मान म्हणून वाशिम येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही सत्यशोधक मंडळींनी आपापल्या पत्नीचे चरणस्पर्श करून दर्शन घेतले, तेव्हा त्यावेळी समाजधुरीणांनी आमची बरीच चेष्टा केली होती. ​लग्नानंतर नव्या नवलाईचे दिवस संपतात,…

Read More

आपण खरंच धार्मिक होत आहोत की,फक्त धार्मिक दिसत आहोत?

हल्ली कुठल्याही मंदिरात गेलं की दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात.त्यातचश्रावण महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळीच भक्तीची धार्मिकता जाणवू लागते. खरं तर श्रावण महिन्याची ओळखच ही “भक्तीमास” म्हणून आहे.शिवाची उपासना मोठ्या आस्थेने केली जाते.जागोजागी कावड मंडळांची लगबग दिसते. भगवे झेंडे, डीजे, घोषणा, मिरवणुका आणि भक्तांची गर्दी रस्त्यावर दिसू लागते.दिंडी आणि वारी ही केली जातेमंदिरांमध्ये दर्शनासाठी…

Read More

मराठा सेवा संघाच्या ३६ वर्षांच्या प्रवासाकडे आज नव्याने पाहण्याची गरज आहे का?

एक सप्टेंबर 1990 रोजी अकोला येथे आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन मराठा सेवा संघ या सामाजिक चळवळीची स्थापना केली . चळवळ ही समाजाच्या विकासासाठी विचार पुरवणारे माध्यम असते . कोणत्याही सामाजिक परिवर्तनवादी चळवळीचे मानव कल्याण हेच अंतिम उद्दिष्ट असायला हवे . अन्यायाची जाणीव निर्माण करणे , अन्यायग्रस्तांना संघर्षासाठी प्रेरित करणे ,…

Read More

देणाऱ्याने काय द्यावे … विंदा

“हिरव्या पिवळ्या माळावरून, हिरवी पिवळी शाल घ्यावी;सह्याद्रीच्या कड्यावरून, छातीसाठी ढाल घ्यावी.” विंदाची ही कविता आजही अनेकांच्या स्मरणात आहे..विंदा करंदीकर यांचा आज जन्मदिवस! करंदीकर यांनी मराठी कवितेला नवे विषय, नवी भाषा आणि नवी अभिव्यक्ती दिली. त्यांच्या कवितेत संवेदनशीलता होती, पण त्याचबरोबर तर्क, विद्रोह, सामाजिक भान आणि जीवनाकडे पाहण्याची स्वतंत्र दृष्टीही होती. वेड्या पिशव्या ढगांकडून वेडेपिसे आकार…

Read More

तेव्हा देव कुठे होता ? तर स्मशानातल्या त्या दोन मुस्लिमां हातून , भडाग्नी देत होता ..!!

अल्बम चाळताना अचानक हा फोटो समोर आला…आणि डोळ्यासमोर उभा राहिला तो काळ – भीतीचा, असहायतेचा, आणि माणुसकीची खरी परीक्षा घेणारा…लॉकडाऊनचा तो भयानक काळ…जिथे जिवंत माणूस माणसाला घाबरत होता…जिथे नाती, रक्ताची असोत किंवा जिव्हाळ्याची – सगळी दूर पळाली होती…मृत्यू इतका जवळून फिरत होता की प्रत्येक श्वास भीतीने भरलेला होता…लोक पटापट मरत होते…स्मशानभूमीत प्रेतांचा ढीग लागत होता…आणि…

Read More

“चंपा” च्या मेंदूची ‘फॉरेन्सिक क्रांती’ : आणि नोबेलची शिफारस

​ ✍️ गजानन खंदारे आपला भारत देश आता निर्विवाद जागतिक महासत्ता बनला आहे, यासाठी आणखी कोणतीही सिद्धता किंवा पुरावा देण्याची गरज उरलेली नाही. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात “चंपा”सारखे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आपले अवतारकार्य पुढे नेत असताना आपण सर्वच धन्य झालो आहोत!अलीकडेच दिल्लीत काही तरुणांनी आंदोलन केले. त्या संदर्भात “चंपा” यांनी एक विधान केले – त्यांच्या…

Read More

देऊळबंद : देवाच्या अस्तित्वालाच आव्हान! एक संदर्भ

✍️ गजानन खंदारे गावाखेड्यांत अध्यात्माच्या नावाखाली चालणारी ‘धार्मिक दुकानदारी’ एका नव्या चिंतेचा विषय बनत आहे. आज मंदिरांची संख्या आणि तिथली गर्दी वाढते आहे; पण या “व्यवस्थेचे” गुलाम झालेले लोक वैचारिक विद्रोह करण्याऐवजी अंधश्रद्धेचे अधिक आणि पक्के गुलाम बनत चालले आहेत. विदारक गोष्ट म्हणजे, या भोंदूगिरीच्या जाळ्यात “महिला वर्ग” मोठ्या प्रमाणावर भरडला जातो आहे. याच सामाजिक…

Read More

स्मशानातील अश्रूंचे रूपांतर झाले ‘अंकुरात’…!​​

हल्ली मूत्यू सुद्धा उत्सव प्रियतेचा सोहळा बनतोय! माणूस जगाचा निरोप घेतो तेव्हा मागे उरतात फक्त त्याच्या आठवणी. या आठवणींना उजाळा देण्यासाठी महागडे, खर्चिक आणि क्षणभंगुर सोहळे केले जातात. मात्र, वाशिम तालुक्यातील सुरकंडी खुर्द येथील भोयर कुटुंबाने दुःखाच्या प्रसंगालाही एक संवेदनशील आणि पर्यावरणपूरक वळण दिले आहे. आपल्या आप्तांच्या स्मृती त्यांनी केवळ मनात नाही, तर थेट निसर्गाच्या…

Read More

“बाग्यासमोर नतमस्तक,छत्रपतीवर मौन!तर्काची हत्या आणि राजकारण” महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?”

गजानन खंदारे “माजी सरन्यायमूर्ती भूषण गवई स्वतःला आंबेडकरवादी म्हणवतात, पण ते धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर धाम) यांच्या पाया पडतात. अशा व्यक्तींनी बाबासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.त्यांनी बाबासाहेबांचे नाव घेऊ नये ” अशी जाहीर टिप्पणी शाम मानव यांनी केली “हे शाम मानव कोण आहेत? त्यांना असा ‘सर्टिफिकेट’ देण्याचा अधिकार कोणी दिला? हल्ली प्रसिद्धीसाठी ते कुठलीही…

Read More
Back To Top