सोनिया गांधी यांचे नवीन आत्मचरित्र 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकावर भारतीय जनता पक्षाचे गटार छाप नेते ज्या पद्धतीने टीका करत आहेत आणि त्यांचे चाळीस पैसेवाले ट्रोलर्स सोनिया गांधींच्या या पुस्तकाला रांडकथा या नावाने संबोधित आहे यावरून त्यांची कुठल्याही स्त्रियांच्या प्रती पाहण्याचा दृष्टिकोन किती घाणेरडा, अत्यंत विकृत, द्वेषमूलक, विषारी, विखारी, मानवतेला काळीमा फासणारा आणि मनुस्मृतीला पूरक आणि पोषक असा आहे. एखाद्या स्त्रीला राजकारणासारख्या क्षेत्रात सर्वोच्च पदावर पोहोचायचं असेल तर त्यांनी सोनिया गांधींचा आदर्श घेतला पाहिजे. कुठलीही स्त्री राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करत असेल तर इथल्या मनुवादी विकृत व्यवस्थेला घाणेरड्या मानसिकतेला हे मुळात सहनच होत नाही आणि मग त्या स्त्रीच्या चारित्र्यावर अत्यंत खोटे अवास्तव लिखाण केले जाते शब्दाची तोडमोड करणारे कलम कसाई एखाद्या साता समुद्र पार केलेल्या आपल्या देशातून दुसऱ्या देशात जाणाऱ्या आपल्या देशातील खान पान रीती रिवाज पेहराव सगळं सोडून भारतासारख्या देशात येऊन तिथली सभ्यता तिथली संस्कृती आणि तिथल्या मातीवर प्रेम करणं आणि तिथल्या माणसांसाठी अहोरात्र स्वतःच्या मुलांना झोकून देऊन स्वतःही अत्यंत निडरपणे एका अमानवी विकृत खुनी व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपटून उभे राहणं एवढं सोपं नसतं हे दिव्य सोनियाजींनी करून दाखवलं
बाबरी विध्वंस प्रकरणात आपल्याला झालेले दुःख हे त्यांनी राजकीय दृष्ट्या लपवायला पाहिजे होतं असे अनेकांनी म्हटले परंतु सत्याला सामोरे जाणे त्यासाठी वाटेल ती किंमत चूकवणे हा गांधी विचार सोनियाजींनी स्वतःमध्ये उतरवला आणि तो पुस्तकातून बाहेर आला. त्याच्यावर टीका टिप्पणी होईल पण सत्य मांडणे, सत्य जगणे यापेक्षा सुंदर आणि देखणं दुसरं काय असू शकतं. सोनियाजींनी लिहिलेलं पुस्तक हे निव्वळ त्यांचं आत्मकथन नव्हे तर कित्येकांची लक्तरे त्यांनी वेशीला टांगलेली आहे. हे जरी खरे असले तरी या पुस्तकाची सुरुवात ही प्रेमापासून झालेली आहे प्रेम, सृजन आणि मानवता याचा संघ आणि भाजप यांच्याशी काहीही संबंध नाही. या संघोट्यांनी गांधी संपवला कारण त्याचा विचार सर्जनशील होता अर्थात नवनिर्मितीचा परिवर्तनवादी होता परंतु गांधी मरत नाही तो आजही आडवा येतो सोनिया गांधींच्या रूपात आणि म्हणून या पुस्तकावर पातळी सोडून केलेली टीका हाच या पुस्तकाचा मोठेपणा आहे आणि त्यामुळेच हे पुस्तक घराघरात वाचलं जाईल.
प्रेमासाठी आपल्या आयुष्याचा केलेला त्याग. जेव्हा जगामध्ये आर्थिक मंदी होती तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारताचा आर्थिक कणा ताठ ठेवला भारत झुकला नाही विकासाच्या दिशेने झेपावला हे मनमोहन सिंग यांनी करून दाखवलं परंतु ही निवड सोनिया गांधींची होती आणि त्यांच्या पाठीशी होता त्यांचा त्याग, समर्पण आणि महानता. ज्यांचा इतिहास शिवरायांच्या मृत्यूच्या कटाचा, अफजलखानाच्या वकिलीचा, आणि इंग्रजांचे बूट चाटून माफी मागण्याचा असा आहे त्यांनी अत्यंत उदात्त, साडेतीनशे कोटी रुपयांची संपत्ती देशाला अर्पण करणाऱ्या दानशूर असा वारसा लाभलेल्या आपली सासू आपला नवरा आणि आता आपली दोन्ही मुलं देशाला समर्पित करणाऱ्या अत्यंत सुसंस्कृत संयमी परंतु अत्यंत निडर अशा सोनिया गांधीं बद्दल पातळी सोडून टीका करणाऱ्या गटार छाप नेत्यांनी आणि त्यांचे ट्रोलर्स यांनी आपल्या घरी जाऊन आपल्या माय, बहिणीच्या डोळ्यात डोळे टाकून पाहावे लाज वाटत नसेल तर आत्महत्या करावी. आणि माझ्या कुठल्याही माय बहिणीला इतर कुठल्याही आणि राजकारणा सारख्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवायचा असेल तर त्यांनी सोनिया गांधींसारख्या टीकेला सामोरी जाण्याची ताकद ठेवावी
हेमंत टाले
9975807632


