‘नवसाला पावणारा देव : चमत्काराचे वास्तव की मानसिकतेचे थोतांड!’

✍️ गजानन खंदारे समाजात देवाला “नवस” बोलण्याची परंपरा फार जुनी आणि खोलवर रुजलेली आहे. “देवाला नवस बोलला आणि तो पूर्ण झाला” म्हणजे देव पावला अशा असंख्य कथा, आख्यायिका आणि अनुभव आपण सतत ऐकत आलो आहोत.या अशा कथातुन नवसाला पावणारे अनेक देव जन्माला आलेत. किंवा घातले गेलेत अनेक देव, देवस्थाने आणि चमत्कार प्रसिद्ध झाले. अनेक ठिकाणांची…

Read More

स्वतः सोबत देवाला फसवणारी माणसं! आषाढी विशेष ..

आपल्याकडे दोन प्रकारच्या धार्मिक परंपरा रूढ आहेत. एक वैदिक हिंदू परंपरा आणि दुसरी वारकरी विचारांची साधी, सरळ भक्तीमार्गाची परंपरा. दोन्ही परंपरा समांतर चालणाऱ्या असल्या तरी त्यांच्यातील विचारधारा मात्र पूर्णपणे वेगळी आहे.आणि नेमकं इथेच आजच्या काळात गोंधळ निर्माण झाला आहे.अलीकडच्या काळात कीर्तन परंपरेत जशी “कथित” वारकऱ्यांची घुसखोरी झाली.भक्ती मार्गातही आपण आपल्याच मनानुसार घुसखोरी करून घेतली. संस्कृती…

Read More

मेल्यावरही पोचवण्याची घाईच? नऊ तासांचा प्रवास आणि मनाचे ओझे ! ✍️ गजानन खंदारे

​ अलीकडे रोजच मरणाच्या बातम्या आणि घटना आपल्या कानावर येत राहतात. त्याचे दुःख आता मनाला भिडण्याऐवजी केवळ शब्दांतच अधिक उतरते आहे, असे मला वाटत असतानाच परवा माझे सासरेबुवांच्या अचानक जाण्याची बातमी आली.​जेव्हा नात्यातील एखादी जवळची व्यक्ती अशी अचानक सोडून जाते, तेव्हा त्या नात्यातील परस्पर संवादाच्या खोलीवरच दुःखाचा गहिवर ठरत असतो.बायको पुण्यात असताना तिला ही घटना…

Read More

देव की थोतांड? हरवलो कोण — देव की आपण?

हा विषय अत्यंत खोल आणि गहन आहे. किंबहुना तो तसा म्हणून जास्त खोलात न शिरता, या प्रश्नाचे उत्तर मला ओशो रजनीश यांच्या प्रवचनात व -ग्रंथांत सापडते.त्याच उत्तराचा हा थोडक्यात उहापोह आहे. ईश्वरप्राप्तीच्या शोधात असताना आपली अवस्थाकावळ्यासारखी होत चालली आहे. याची चर्चा वरील मजकुरात आहे .म्हणजे नेमकी कशी तर ..ना आपण जे आहोत ते राहिलो,ना जे…

Read More

पिंपळ, पोळे आणि हरवलेला बुद्ध..

कालची ती संध्याकाळची वेळ… आकाशात मंद उजेड शिल्लक होता, आम्ही तिघे—शिवाजी कव्हर, दिलीप भिसडे आणि मी—पार्डी तिखेच्या रस्त्याने लग्नासाठी निघालो होतो. गाडीच्या गतीतही मन कुठेतरी स्थिर होत होतं. तेवढ्यात बाजूच्या शेतात उभ्या असलेल्या एका पिंपळावर नजर स्थिरावली…तो पिंपळ—पानगळ झालेला, विरळ फांद्यांनी जणू आकाशाला स्पर्श करणारा— काळाच्या ओघात थकलेला वाटत होता. एके-वेळी हिरवागार असलेला तो वृक्ष…

Read More

“ब्रिगेडी-यन” परशुरामाला का मानत नाहीत ..!

काल अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाला गेलो होतो.उदगीर, शिरूर ताजबंद या भागात काही ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांचे अश्वारूढ पुतळे दिसले. या भागात महात्मा बसवेश्वरांना मानणारा लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि हा परिसर कर्नाटक सीमेच्या जवळच आहे.आज “अक्षय तृतीया” असून आजच “महात्मा बसवेश्वर” यांची जयंती आहे. समाजात समता, बंधुता आणि न्याय यांचा संदेश देणाऱ्या…

Read More

देवाचा बाजार आणि हरवलेला माणूस! देव तुमच्याच शोधात..!

गेल्या अनेक वर्षांपासून मी अध्यात्म, धर्म, संस्कृती आणि परंपरा यांचा वाचन, अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या ज्ञानाच्या अथांग समुद्राला अजून साधा स्पर्शही करू शकलो नाही, ही जाणीव सतत मनात राहते. तेव्हा साहजिकच मनात अनेक प्रश्न उभे राहतात — नेमकं सत्य काय? चराचरात आणि माणसामाणसांत व्याप्त असलेला देव आज ठराविक धर्म विक्रेत्यांची आणि काही…

Read More

तुकाराम महाराजांचे नेमके काय झाले? काही अनुत्तरित प्रश्न

धूळवड — रंग, उत्साह आणि गोंधळाचा दिवस.याच दिवशी तुकाराम महाराज अचानक नाहीसे झाले, अशी परंपरेतील कथा सांगितली जाते. श्रद्धेनुसार ते सदेह वैकुंठाला गेले असे मानले जाते. परंतु इतिहासाच्या दृष्टीने पाहिले असता या घटनेचा समकालीन दस्तऐवजी ठोस पुरावा उपलब्ध असल्याचे दिसून येत नाही. काही जण म्हणतील की श्रद्धेच्या गोष्टी पुराव्याच्या कसोटीवर तपासायच्या नसतात; त्या मान्य करायच्या…

Read More

मन चंगा तो…!

काल सातारकर बाबा मंदिर सभागृहात संत शिरोमणी रविदास महाराज जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. खरं तर जयंती म्हंटलं कीपूजन, फोटो, मिरवणूक, डि जे, फार तर भाषणं आणि औपचारिक कार्यक्रम इतपतच गोष्ट मर्यादित राहते.पण इथे चर्मकार समाजाच्या स्वतःच्या स्थापित प्रबोधिनीने समाजासाठी नेमकं काय केलं आहे, कसं काम केलं आहे, याचा लेखा-जोखाच मांडला.हा लेखाजोखा केवळ माहिती देणारा…

Read More

घेता कोणाची,देता कोणाची! वाण नेमके कशासाठी ?

शेतातली नविन जिन्नसाची नव्हाळी घेऊन आई एखाद्या घरी पाठवायची.तेव्हा त्या घरातील स्त्री नम्रपणे म्हणायची—” बाळ, आमच्याकडे आधीच माहेरकडून वानूळा आलाय.”मग प्रश्न पडायचा हा वानूळा म्हणजे नेमकं काय?आणि संक्रांतीला स्त्रिया “वाण” का देतात?तर या प्रश्नाचे सोपे उत्तर म्हणजे“वाण” हा बोलीभाषेतील अतिशय प्रभावी शब्द आहे.ज्याला कशाचीच वाण नाही—म्हणजे कमतरता नाही—अशी संपन्नता आणि पुरेपणाची जाणीव हा शब्द व्यक्त…

Read More
Back To Top