साहेब! आता तरी थोडी लाज वाटू द्या,हा ‘सन्मान’ कि ‘प्रेतावरचा’ मान !
जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन आणि सरकार नावाच्या व्यवस्थेला आता खरंच लाज वाटायला पाहिजे!कारण आज ज्या गोष्टींचा डंका पिटला जातोय, त्या प्रत्यक्षात शिक्षण व्यवस्थेच्या अपयशावर टाकलेलं झाकण आहे.आणि उघड उघड शिक्षणाच्या “प्रेतावरचाच” मान आहे !म्हणे …कालएक शिक्षक विहित मुदतीच्या आत १००% फिजीकल आणि डिजिटल डोकी मोजतो.गावात फिरतो, रात्री- दिवसा लोकांच्या घरी जाऊन माहिती गोळा करतो… आणि त्यासाठी…
