CIBIL स्कोर सुधारण्यासाठी महत्वाच्या टिप्स 

CIBIL स्कोर सुधारण्यासाठी महत्वाच्या टिप्स 

आजच्या डिजिटल युगात CIBIL स्कोर (क्रेडिट स्कोअर) हा आर्थिक विश्वातील महत्वाचा घटक बनला आहे. सामान्यतः ७२० स्कोर चांगला समजला जातो, तर ७६० पेक्षा अधिक स्कोर ‘उत्तम’ श्रेणीत धरला जातो. बँका, एनबीएफसी कंपन्या किंवा डिजिटल ॲप्स कर्ज देताना किंवा क्रेडिट कार्ड देताना याच स्कोरचा विचार करतात.

पण बऱ्याच वेळा स्कोर कमी असल्यास तुम्हाला ‘मिक्स कर्ज’ घेण्याचा सल्ला दिला जातो. मिक्स कर्ज म्हणजे सुरक्षित (secured) आणि असुरक्षित (unsecured) कर्ज यांचे मिश्रण.
उदा.

  • सुरक्षित कर्ज म्हणजे जिथे तुम्ही गहाणखत, पगारपत्रक, मालमत्ता किंवा एफडी दाखवता.
  • असुरक्षित कर्ज म्हणजे जिथे केवळ आधार आणि पॅन कार्डवर ॲपमार्फत दिले जाते.

बरेच लोक CIBIL वाढवण्यासाठी बँकेच्या सल्ल्यानुसार सोनं गहाण ठेवून कर्ज घेतात किंवा ₹20,000 किंवा त्याहून अधिक रकमेची एफडी करून त्यावर क्रेडिट कार्ड घेतात. हा खर्च तुमच्यासाठी नको असला तरी ‘क्रेडिट मिक्स’ दर्शवण्यासाठी याचा फायदा होतो.

जर तुमच्याकडे आधीच क्रेडिट कार्ड असेल, तर त्याचा वापर मर्यादित ठेवा. उदाहरणार्थ, ₹1 लाख लिमिट असल्यास त्यातील ३०% म्हणजे ₹30,000 पेक्षा जास्त खर्च करू नका. आणि बिल नेहमी वेळेपूर्वीच भरा. काही विश्लेषक १०–१५% युटिलायझेशन ठेवण्याचा सल्ला देतात.

तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल, तर ₹5,000 FD वर क्रेडिट कार्ड ही चांगली सुरुवात असू शकते. अनेक बँका यावर ₹499 वार्षिक शुल्क घेतात. मात्र SBM बँकेचे FD आधारित क्रेडिट कार्ड कोणतेही शुल्क न लावता मिळते.

📌 SBM FD Credit Card ची अधिकृत माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंक वापरू शकता:
👉 SBM FD Credit Card माहिती घ्या

CIBIL स्कोर वाढवण्यासाठी इतर टिप्स:

  • सर्व EMI व क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरा
  • जुनी क्रेडिट हिस्ट्री असलेले कार्ड बंद करू नका
  • ३०% पेक्षा कमी युटिलायझेशन ठेवा
  • विविध प्रकारचे कर्ज ठेवा (उदा. हौसिंग लोन + क्रेडिट कार्ड)
  • नियमितपणे स्कोअर तपासून चुका दुरुस्त करा

CIBIL स्कोर म्हणजे तुमच्या आर्थिक शिस्तीचा आरसा आहे. योग्य नियोजन, काटेकोर हफ्ते आणि विचारपूर्वक आर्थिक निर्णय यामुळे तो सहज सुधारता येतो. थोडी जागरूकता आणि संयम राखल्यास तुम्हीही ७५० चा स्कोर सहज गाठू शकता.

हे हि वाचा 👇🏻

बँकिंग व फायनान्स कंपन्यांची दादागिरी: खाजगी सावकारी बंद करून NBFC ना मोकळे रान

फुकटचा सल्ला

कर्जाच्या जाळ्यात अडकू नका — खरी समृद्धी साधेपणात आहे

आपल्या गावात–घरात जुनी माणसं नेहमी सांगायची –
👉 “ऋण काढून सण साजरे करू नका.”
👉 “अंथरून पाहून पाय पसरा.”

ही वाक्यं फक्त म्हणी नाहीत, तर आर्थिक शहाणपणाचा मूलमंत्र आहेत.


1️⃣ कर्ज घेऊन आनंद नाही, ओझेच वाढते

  • वाढदिवस, सण, लग्न, पार्टी – हे उत्सव महत्त्वाचे आहेत.
    पण कर्ज काढून खर्च केलेला उत्सव आनंद देत नाही, तो आयुष्यभराची चिंता वाढवतो.
  • आज घेतलेले “फक्त 5 हजाराचे” कर्ज उद्या व्याजासकट 10 हजार होते,
    आणि ती परतफेड न झाल्यास CIBIL स्कोअर आयुष्यभराचा डाग बनतो.

2️⃣ क्रेडिट कार्ड = दोधारी शस्त्र

  • पगार खात्यात यायच्या आधीच खर्च करायला मिळतो म्हणून आकर्षण वाटते.
  • पण व्याजदर 36% पर्यंत जातो.
  • एका महिन्यात न भरलेली थोडीशी रक्कम पुढे मोठं डोंगर बनते.
    👉 काम नसेल, उत्पन्न कमी असेल तर क्रेडिट कार्ड बंद करून टाका.

3️⃣ “क्रेडिट स्कोअर सुधारतो” म्हणणाऱ्या कंपन्यांपासून सावध रहा

  • या कंपन्या ₹1500–₹5000 घेऊन वचन देतात: “तुमचा स्कोअर झपाट्याने वाढवतो.”
  • प्रत्यक्षात त्या फक्त डिस्प्युट फॉर्म भरतात – जे आपण स्वतः मोफत करू शकतो.
  • म्हणजे थेट शब्दांत सांगायचं तर:
    👉 “ही फक्त तुमची आर्थिक लुबाडणूक आहे.”

4️⃣ आपली ऐपत, आपली मर्यादा ओळखा

  • “शेजाऱ्याचा मुलगा पार्टी करतो म्हणून मीही करतो” –
    ही मानसिकता आपल्याला कर्जाच्या जाळ्यात अडकवते.
  • खरी प्रतिष्ठा म्हणजे कर्ज न घेता जगणे,
    नाही की उधारीतला मोठेपणा दाखवणे.

5️⃣ खरी समृद्धी कुठे आहे?

  • साधं जगणं, काटकसरी जीवनशैली, आणि
    “उत्पन्नाच्या आत खर्च” हीच खरी समृद्धी आहे.
  • ज्याच्याकडे कर्ज नाही तोच खरं तर श्रीमंत आहे –
    कारण त्याच्या झोपेत व्याजदाराचे सावट नाही.

निष्कर्ष

आजच्या काळात मोबाइल अॅप्स, ऑनलाइन लोन, क्रेडिट कार्ड यामुळे कर्ज सहज मिळतं.
पण लक्षात ठेवा –
👉 “सहज मिळालेलं कर्ज सहज परतफेड होत नाही.”
👉 “सण साजरे करा, पण पैशातलं ओझं वाढवून नव्हे, तर साधेपणाने.”

जीवनातली खरी प्रतिष्ठा म्हणजे कर्जमुक्त राहणे.

भालचंद्र पाटील खंदारे

लेखक हे बँकिंग क्षेत्रात विमान नगर पुणे येथे सहाय्यक व्यवस्थापक पदावर आहेत

आपण त्यांचाशी वरील क्रमाक वर Hi मेसेज करून संपर्क करू शकता किंवा फ्री सिबिल माहिती येथे क्लिक करा

Home » CIBIL स्कोर सुधारण्यासाठी महत्वाच्या टिप्स 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top