फक्त “प्रोफाईल स्टेट्स” वरच मुलं मुली एकमेकांना भाळतात! ज्ञानदृष्टी जागृत झालेली,म्हणजे मोबाईल हातात घेऊनच जन्मलेली तरुणाई लगेच गुगल बाबा कडं जातात – “A1 orphan girls for marriage near byee me“.
कधी काळी लग्नासाठी आजूबाजूच्या गावात सोयरे आत्या मावश्यां,मामा कडे चौकशी केली जायची,सोयरीक करणारा एक मध्यस्थी असायचा.
नात्यागोत्यात होणारी लग्न संस्कृती, परंपरेला धरून असायची. आणि हो महत्त्वाचं म्हणजे लग्न ही मुला मुलींची व्हायची. परस्पर सहजीवनाच्या अंगाने स्त्री आणि पुरुषाच्या नात्याला मान्यता दिली जायची. आता लग्न मुला मुली ऐवजी शिक्षणा सोबत होऊ लागली. प्रोफेशन पाहू लागले. लग्न अपेक्षा सोबत होऊ लागली.
लग्नात पुर्वी लग्न जुळवणारा एक मध्यस्थी असायचा तो सोयरीक सांगून आणायचा लग्न जुळवायचा मग शिकलेल्या लोकांनी लग्नात मध्यस्था ऐवजी राजकारण्यांचा सत्कार सुरू केला.लग्नात मध्यस्थी लोंकाचा, पंगतीत पाणी वाढणाराचा, पात्रावळ्या उचणाऱ्याचा विसर पडू लागला
लग्न झाल्यावर मुलगा दारू प्यायला शिकला की मध्यस्थ ला शिव्या देणे सुरू केले.
लग्ना नंतर मुलगी ओरिजनल भांडणाचे स्वभाव गुण दाखवायला लागली की मध्यस्तानीच केले म्हणून त्याला शिव्या घालू लागले. शेवटी मध्यस्थ कंटाळला. आणि लग्नाचा नवीन पॅटर्न सुरू झाला.
माध्यस्था ची जागा आता विवाह संस्थेने घेतली. मध्यस्थी ऐवजी दलाल आले फेसबुक व्हाट्स अप आले. मग शिकलेली लोकं ‘फेसबुक सर्च’मध्ये “सुसंस्कारित वधू” टाईप करतात. लगेच १००० बायोडाटा सापडतात – आणि त्यातल्या निम्म्या मुली अनाथ आश्रमातील असतात.काहींचं नाव “मधुर अनाथाश्रम,” असतं, तर काहींना “आईवडीलच नसतात,
फेसबुक वरील प्रत्येक मुलीची एक वेगळी दर्द भरी कहानी असते. फक्त सांभाळ करणारा नवरा पाहिजे” अशी दर्दभरी टायटल असते. आणि हे सगळं पाहून ज्ञानदृष्टी जागृत झालेली, मोबाईल हातात घेऊनच जन्मलेली तरुणाई लगेच गुगल बाबा कडं जातात – “A1 orphan girls for marriage near me”. हे सर्व बनावट आहे हे सांगण्यासाठी आम्ही “मराठा लग्न अक्षदा” वर एक व्हिडिओ टाकला. विषय होता – “अनाथ आश्रमातील स्थळे कशी असतात ,फसवणुकीचे फंडे !”५ लाख लोकांनी तो पाहिला. पाहिला म्हणजे काय? शीर्षक बघितलं, चहा घेतला, आणि आमच्यावरच प्रश्नांची वाफ काढायला सुरुवात केली !”तुमच्याकडे अनाथ मुली आहेत का?” “कुठून बोलता?” “दोन मुली हव्यात, शिकलेल्या असतील तर सांगा! “एक दिवसात १०-१५ फोन यायचे. काहींनी तर विचारलं – “तुमच्या कडच्या मुलींचं रेट काय?” आम्ही चिडून सांगितलं – हो आहेत, पण त्या तीन वर्षाच्या आहेत – दत्तक घेण्यासाठी!त्यावर समोरून – “आम्हाला लग्न करायचंय, झिंगाट नाय करायचं!” – आणि वरतून दोन शिव्या.—मध्यस्थ गायब झाला, DJ आला! पूर्वी मध्यस्थ असायचा – गावातला विश्वासू माणूस, स्वतःची गाडी घेऊन, स्वतःचं पेट्रोल टाकून स्थळ दाखवायला यायचा. मुलीकडचं स्थळ दाखवून लग्न कुंकू ,साक्ष गंध अगदी लग्न लागून नवरी वाटेला लागे पर्यंत डोळ्यात तेल घालून जागा असायचा.पदर मोड करून आहेर ,आंदन घ्यायचा. मग काही दिवसांनी लोकं शिकून सु-शिक्षित झाली ,सुधारणावादी विचाराने प्रेरित होऊन मध्यस्था ऐवजी पुढारी लोंकाचे सत्कार ,भाषणे ठेऊ लागली. मध्यस्थ? तो तर उपाशीच!मध्यस्थ बिचारा चार सहा महिने लोटले कि दिवाळीची पहिली साडी फाटायला झाली कि –”कसली मुलगी दाखवलीस रे? आता खर रूप दाखवतेय!” “तुझं स्थळ तर दारू पिऊन फिरतंय आता!” आणि मग मध्यस्थावर सगळा दोष टाकून तो इतिहासजमा केला गेला.—वरात गेली, DJ आला, आणि शिष्टाचार फाटून नाच सुरु झाला! पूर्वी वरात निघायची – सनई, चौघडा, गावातल्या सर्वजणांचा सहभाग.आज DJ येतो.DJ सोबत येतो दारूचा बॉंक्स , नाचणारे शर्टलेस ,आणि फेर धरायच्या ऐवजी “शिवा बावळट” गाण्यावर ढाल मुंडा. यात जर एखाद्याला हार्ट अटॅक आला, कान फुटले, की मारामारी झाली – कोण जबाबदार?- परणं, पान सुपारी, आणि डीजेची डेसीबेल!पूर्वी परणं म्हणजे गावच्या देवाला पान सुपारी देऊन वऱ्हाडात शिरणं.आजच्या पिढीत – DJ वर “लाल घाघरा” गाणं वाजवून नाच करत प्रवेश करणं म्हणजे परणं!कोणीच विचारत नाही – “सून कुठली? गुण, स्वभाव, विचार?”सगळे विचारतात – “DJ वर काय गाणं लावलंत?”—फेसबुकचा प्रेम, व्हॉट्सॲपचा संसार – आणि कोर्टात टोक!आज फेसबुक-इंस्टाग्रामवर “सिंगल” स्टेटस ठेवलं की, लगेच ४५ “Hi dear” येतात.त्यानंतर सुरु होतं – chatting, dating, meet-up आणि थेट court marriage!पुढे लग्न नको झालं, की लगेच “We are not compatible” चं certificate! कधी NRI सॉफ्टवेअर इंजिनीयर निघतो व्हॉट्सॲपच्या दुकानातला मुलगा, तर कधी आईवडील नसलेली मुलगी निघते पाच फेसबुक अकाऊंटची स्पेशालिस्ट.—थोडं थांबा, विचार करा! लग्न म्हणजे Instagram स्टोरी नाही – २४ तासांनी गायब होईल असं.लग्न म्हणजे “रिलेशनशिप स्टेटस” नव्हे – ते नातं, संस्कार, आणि संवाद असावं लागतं.आज आपण लग्नाचं एक “डिजिटल पॅकेज” बनवलंय –“शुभमंगल + मेकअप + हनिमून + फोटोशूट + कोर्ट पेपर + इन्स्टाग्राम रील!”पण यामागे माणूस, स्वभाव, संयम, आणि समजूत कुठे गायब झाले?—आता हे वाचल्यावर काय कराल?👉 फेसबुकवरचा “मुलगी अनाथ आहे” असं वाचून लगेच इमोशनल व्हाल?👉 की DJ नसेल तर लग्न रद्द कराल?👉 की मध्यस्थाचं ऐकून एकदा शांतपणे विचार करून लग्न कराल?विचार करा – लग्न एक समारंभ नाही, ती एक सामाजिक, मानसिक, आणि भावनिक गुंतवणूक आहे.—लेख आवडला? तर शेअर करा – आणि पुढचं स्थळ बघताना डोळे, मेंदू आणि हृदय – तिघेही वापरा!
स्थळ शोधताय मग ईथे सर्वच मोफत आहे vdo पाहण्यासाठी click करा
✍️ लेखकांना विशेष आवाहन –
सामाजिक, राजकीय आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर लिहिणारे, आपल्या विचारांना धार देणारे लेखक, पत्रकार, अभ्यासक व जनतेचा आवाज बनू इच्छिणारे आपण सर्वांनी पुढे या.
आपले लेख, मतं आणि अभ्यास आमच्यासोबत शेअर करा, जेणेकरून खरी जनमत जागृती होईल.
संपर्कासाठी: गजानन खंदारे रिसोड पत्रलेखक
https://wa.me/919850426626?utm_source=chatgpt.com
Disclaimer: हा मजकूर विडंबनात्मक व उपरोधिक निवेदन आहे. कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेवर थेट आरोप करण्याचा हेतू नाही. उद्देश सामाजिक-राजकीय प्रश्नांवर चर्चेला वाव देणे हाच आहे.
