स्कोर वाढवायचा? अ‍ॅप्सपासून सावध पैसे देऊन काहीच बदलत नाही!

वेळेवर हप्ते न भरल्याने, क्रेडिट कार्ड किंवा कर्जाचा हप्ता उशिरा भरला की स्कोर घटतो. क्रेडिट कार्ड लिमिटचा अति वापर : जर तुम्ही 80–90% लिमिट वापरत असाल, तर स्कोर कमी होतो.म्हणजे उदा.क्रेडीट कार्ड लिमिट 1 लाख दरमहा खर्च करता २५-३० % पेक्षा जास्त स्कोर घटतो. एकदम अनेक कर्ज किंवा कार्डसाठी अर्ज: सतत लोन/कार्डसाठी अर्ज केल्यास “hard inquiry” होते, स्कोर घसरतो.चुकुनही हि अनोळखी लिंक वर क्लिक करू नका .जुनी क्रेडिट हिस्ट्री बंद करणे
– जुनी चांगली हिस्ट्री असलेली अकाउंट्स बंद केल्यास स्कोरवर वाईट परिणाम होतो.

एक जुनी म्हण “आपण आपलं जपावं अन शत्रू असलेल्या या विदेशी क्रेडीट कंपन्याशी गोड राहावं “भारतामध्ये 4 अधिकृत (विदेशी)क्रेडिट ब्युरो आहेत: CIBIL (TransUnion),Experian,CRIFHighmark व Equifax

समजा एका व्यक्तीने चार वर्षपूर्वी १६०० व २२०० रुपये online कर्ज घेतले १६०० वेळेत भरले पण २२०० दीड वर्ष भरलेच नाही.(पुरावा म्हणून screenshotखाली पहा ) अशा स्थितीत त्याने दोन वर्षा नंतर ते क्लोज केले .तेव्पहापासून त्णयाचे कडे कुठलेच कर्ज नाही पण

स्कोर सिबिल कंपनी 645 दुसरी 769 तिसरी 700 व चौथी कंपनी 621 असा विसंगत स्कोर एकाच व्यक्तीचे दाखवते. vdo पहा

दोन वर्षा पासून स्कोर वाढत नाही. किंवा एखाद्या व्यक्तीने भूतकाळात बरेच हफ्ते bounceकेले .परिणाम स्कोर कमी .

👉🏻 आता प्रत्येक कंपनीचा स्कोर वेगळा का ?तर सोप्या भाषेत सरकारच्या परवानगीने गोपनीयतेचा भंग करून आपला डाटा आपल्यालाच विकून हा सरकारच्या परवानगीने सुरु असलेला व्यवसाय किंवा बाजार

स्कोर वाढवण्यासाठी उपाय (प्रॅक्टिकल टिप्स):क्रेडिट रिपोर्ट मध्ये ‘Settled’, ‘Written-Off’ असे remarks असल्यास बँकेशी संपर्क करून “Full & Final Payment” नंतर “Closed” स्टेटस अपडेट मागा.Loan घेण्याचा विचार न करता फक्त स्कोर सुधारण्याच्या उद्देशाने secured credit वापरा.Loan घेण्याचा विचार न करता फक्त स्कोर सुधारण्याच्या उद्देशाने secured credit वापरा.CIBIL किंवा इतर ब्युरो वरून online dispute raise करून चुकीची माहिती सुधारता येते.

म्हत्वाचे म्हणजे तुमचा सिबिल स्कोर वाढवण्यासाठी मिक्स कर्जाचा सल्ला दिला जातो.
मिक्स कर्ज म्हणजे बँकेच्या भाषेत सुरक्षित व असुरक्षित कर्ज सुरक्षित म्हणजे पगार पत्रक किंवा गहाणखत करून घेतलेले कर्ज. अ-सुरक्षित म्हणजे मोबाईल ॲप द्वारे फक्त आधार व पॅन कार्ड वर घेतलेले कर्ज आता सिबिल वाढण्यासाठी तुम्हाला सुरक्षित कर्ज देण्याचा सल्ला दिला जातो.

अशावेळी सोने गहाण ठेऊन कर्ज घ्यावे किंवा फिक्स डिंपॉझीट वर क्रेडीट कार्ड घ्यावे असा सल्ला दिला जातो .त्यासाठी आमचा सल्ला कुठलेही शुल्क नसलेले क्रेडीट कार्ड च्या माहिती साठी यावर क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top