“गेट आऊट फ्रॉम हेअर!” — बाई, बाटली आणि राजकारणाचा आरसा

हा लेख सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा आहे.
“गेट आऊट फ्रॉम हेअर!” या एका साध्या वाक्यातून सामान्य नागरिकांच्या मनातील संताप, त्रास आणि अस्वस्थता व्यक्त होते.रस्त्यावर अडकलेला नागरिक आणि त्याच्या नावावर चालणारं राजकारण — यामधला विरोधाभास या लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

गर्दीत माणसं आणि माणुसकी हरवते , यापेक्षा आपण रोजच्या गर्दीला सरावलो आहोत असं आपण समजतो…
पण कधी कधी हीच गर्दी शहाण्या लोकांनाही शिकवते की “लोकशाही” म्हणजे नेमकं काय असतं!

याचा प्रत्यय वरळीच्या रस्त्यावर आला. घटनेचा व्हिडिओ विजेच्या वेगाने पसरला.
त्यातच बाइट देताना ‘भाऊ’ म्हणाले की, बाईने इंग्लिश बोललं आणि बाटलीही फेकली.
“बाई आणि बाटली” या संदर्भातून नामुष्की कशी उघडी पडते, याचा अनुभव पुन्हा एकदा समोर आला.

रस्त्यावरचं हे उभं वास्तव पाहून त्या वास्तवाला आवाज मिळाला — तोही एका साध्या महिलेच्या तोंडून:
“गेट आऊट फ्रॉम हेअर!”

ही त्या मंत्र्याला दिलेली फक्त चपराक नव्हती, तर व्यवस्थेला दाखवलेला आरसा होता.

तसा हा आरसा याआधीही दाखवला गेला आहे. मोर्चा महिलांसाठी होता, असं म्हणतात…
पण महिलाच रस्त्यावर अडकल्या होत्या!

“गेट आऊट फ्रॉम हेअर!”
हे फक्त शब्द नव्हते…
हा सामान्य माणसाच्या भावना व्यक्त करणारा स्फोट होता!

मंत्री सांगतात — बाईने इंग्लिश बोललं, बाटली फेकली…
पण खरी गोष्ट अशी आहे —


लोकांच्या मनातला राग आधीच उकळत होता;
बाटली तर फक्त व्यक्त होण्यासाठी निमित्त ठरली!

आजकाल एक नवा फॅशन झाला आहे —
“जनआक्रोश” नावाचा मोर्चा काढायचा…
आणि त्या आक्रोशातच सामान्य माणसालाच अडकवायचं!

प्रश्न साधा आहे —
हा मोर्चा महिलांसाठी होता, की महिलांनाच त्रास देण्यासाठी?

कारण ज्या महिलांसाठी आवाज उठवतो म्हणता,
त्याच महिला रस्त्यावर उभ्या राहून
तुम्हालाच “निघा इथून!” म्हणत आहेत —
यापेक्षा मोठा विरोधाभास काय असू शकतो?

ही घटना फक्त एका बाईची नाही…
हा प्रश्न फक्त एका आईचा नाही —
तो प्रत्येक त्या माणसाचा आहे,
जो रोजच्या जगण्यात अडकलेला आहे…
आणि राजकारण त्याला आणखी अडकवत आहे!

ही अडकलेल्या प्रत्येक माणसाची भावना आहे —
सिग्नलवर थांबलेला माणूस,
ऑफिसला उशीर झालेला कर्मचारी,
घरी पोहोचण्यासाठी धडपडणारी महिला…

सगळ्यांचा एकच आवाज —
“आमच्या नावाने राजकारण करू नका!”
“आधी रस्ता मोकळा करा, मग भाषण द्या!”

लोकशाही फक्त स्टेजवर नसते…
ती रस्त्यावरही उभी असते!

आणि जेव्हा ती भडकते,
तेव्हा ती माईक पकडत नाही —
ती सरळ सांगते:

“गेट आऊट फ्रॉम हेअर!”

✍️ गजानन खंदारे

जिल्हा-प्रमुख संभाजी ब्रिगेड वाशिम

समाज माध्यम प्रकोष्ठ

⚠️ Disclaimer

या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक आहेत.
कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा पक्षाची बदनामी करण्याचा हेतू नाही.
सदर लेख केवळ सामाजिक वास्तव आणि लोकभावना यांचे प्रतिबिंब म्हणून मांडलेला आहे.
घटनांवरील प्रतिक्रिया सार्वजनिक उपलब्ध माहिती आणि निरीक्षणांवर आधारित आहेत.

Most Viewed Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top