हा विषय अत्यंत खोल आणि गहन आहे. किंबहुना तो तसा
म्हणून जास्त खोलात न शिरता, या प्रश्नाचे उत्तर मला ओशो रजनीश यांच्या प्रवचनात व -ग्रंथांत सापडते.
त्याच उत्तराचा हा थोडक्यात उहापोह आहे.
ईश्वरप्राप्तीच्या शोधात असताना आपली अवस्था
कावळ्यासारखी होत चालली आहे. याची चर्चा वरील मजकुरात आहे .म्हणजे नेमकी कशी तर ..
ना आपण जे आहोत ते राहिलो,
ना जे व्हायचं होतं ते झालो.
याचं कारण एकच आहे —
आपण मार्ग चुकलो आहोत.
पण प्रश्न असा आहे,
मार्ग चुकला म्हणजे नेमकं काय चुकलं?
आपल्या धार्मिक परंपरेत देव कधीच कमी नव्हते नाहीत,
ग्रंथ कमी नव्हते,
संत कमी नव्हते.
तरीही माणूस अस्वस्थ, दुःखी, तणावग्रस्त का झाला?
कारण — आपण देव मानण्यात अडकलो,
पण देव समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही.
देव मानणे आणि देव समजणे यात नेमका काय फरक असू शकतो तर
देवाला मानणे म्हणजे — भीती ठेवणे,
व्रत–वैकल्ये करणे,
नियम पाळणे, यात देवाला किंवा देवाच्या तथाकथीत एजंटला धर्म विक्रेत्या ठेकेदाराला
प्रश्न विचारण्याची मुभा नसते. ज्याला सोप्या भाषेत अंधानुकरण म्हणता येईल
मग
देवाला समजणे म्हणजे नेमके काय ?— तर स्वतःच्या वागण्यात बदल करणे,
दुःखाचं कारण शोधणे,
हिंसा, लोभ, अहंकार ओळखणे,
१९९० च्या दशकात ओशो रजनीश यांची प्रवचनावर आधारित “मानो मत, जानो” ही आवृत्ती प्रसिद्ध झाली.
त्यामध्ये ते अत्यंत परखडपणे सांगतात की —
तुम्हाला जर खरे अर्थाने आस्तिक व्हायचे असेल, तर आधी नास्तिक व्हावे लागेल.
ईश्वराला न मानणे म्हणजे ईश्वराचा नकार नव्हे,
तर ईश्वराला स्वीकारण्याची खरी सुरुवात आहे.
देवाला फक्त मानणे थांबवा, त्याला समजून घेणे, अनुभवणे सुरू करा.
असे केल्यास,
तुम्हाला आपोआपच ईश्वरप्राप्तीचा सोपा आणि सरळ मार्ग सापडेल.
मग त्यासाठी काय करावे लागेल… तर…!
विशिष्ट देवाला न मानता संतांनी सांगितलेला देव स्वीकारायचा.
ईश्वरप्राप्तीचा नेमका आणि खरा मार्ग कोणता?
आपण पाप आणि पुण्याच्या संकल्पना मानायच्या
पाप कशात आणि पुण्य कशात? ही जाणीव कृतीत आणली की देव तुमच्या पुढ्यात उभा ठाकतो हा अनुभव मला स्वतःला अनेक वेळा आला.मग उभा राहणारा देव हा विविध प्रतिकांच्या स्वरुपात असू शकतो .
व्रत, उपवास, कर्मकांड ई केल्याने पुण्य मिळते हा गैरसमज असु शकतो.
या मुळे दुःखातून मुक्ती मिळण्या ऐवजी संकटे अधिक वाढतात असा अनेकांचा अनुभव आहे.
तुमचे अनुभव नक्की लिहा
