पी. एस. खंदारे : मला बुद्ध सांगणारा गाडगेबाबा हरपला…!
– गजानन खंदारे मोप (रिसोड) इथल्या संवेदनाहीन सरकारी व्यवस्थेने सुमारे १४ हजार सरकारी शाळा बंद करण्याचा घाट घातला होता. माझ्यासह अनेक सहकारी मित्र व्यथित झाले होते. आम्ही काही जण सरकारशी दोन हात करण्याची भाषा करत होतो; तसेच नियोजनही सुरू होते. शेवटी ८ जानेवारी २०२३ ही तारीख निश्चित झाली. शाळा आणि शिक्षण वाचवण्यासाठी आम्ही अक्षरशः धावपळ…
