💬 WhatsApp ग्रुप जॉइन करा

भंडार-दऱ्याच्या वाटेवर नेमकं ….?

सप्टेंबर 2026… शनिवार … शिक्षक दिनाची सकाळची शाळा आटोपून घरी आलो. रोजच्या दिवसासारखाच दिवस होता. शाळेतील काम, विद्यार्थ्यांची लगबग आणि त्यानंतर घरी परतण्याची घाई. तेवढ्यात कव्हर सरांचा फोन आला….चला, कुठेतरी जाऊ….अचानक आलेल्या त्या वाक्याने दिवसाचा सगळा मूडच बदलला….कुठे? ते नंतर ठरवू. आधी निघूया….काही वेळात बोरकर सरांशी कॉन्फरन्सवर बोलणं झालं. बिल्लारी सर, कावरखे सर आणि आणखी…

Read More

“सहजीवनाच्या गद्दे पंचविशीत ” ती ..आणि माझ्या प्रेमाची गोष्ट !

पती-पत्नीचं नातं हे केवळ नवरा-बायकोचं नातं नसतंच मुळी; ते खऱ्या अर्थाने परस्पर सहजीवनाचं नातं असतं. म्हणूनच हे नातं जगाला दाखवायचं नसतं, तर मनापासून जपायचं असतं. स्त्रीत्वाचा सन्मान म्हणून वाशिम येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही सत्यशोधक मंडळींनी आपापल्या पत्नीचे चरणस्पर्श करून दर्शन घेतले, तेव्हा त्यावेळी समाजधुरीणांनी आमची बरीच चेष्टा केली होती. ​लग्नानंतर नव्या नवलाईचे दिवस संपतात,…

Read More

आपण खरंच धार्मिक होत आहोत की,फक्त धार्मिक दिसत आहोत?

हल्ली कुठल्याही मंदिरात गेलं की दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात.त्यातचश्रावण महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळीच भक्तीची धार्मिकता जाणवू लागते. खरं तर श्रावण महिन्याची ओळखच ही “भक्तीमास” म्हणून आहे.शिवाची उपासना मोठ्या आस्थेने केली जाते.जागोजागी कावड मंडळांची लगबग दिसते. भगवे झेंडे, डीजे, घोषणा, मिरवणुका आणि भक्तांची गर्दी रस्त्यावर दिसू लागते.दिंडी आणि वारी ही केली जातेमंदिरांमध्ये दर्शनासाठी…

Read More

‘नवसाला पावणारा देव : चमत्काराचे वास्तव की मानसिकतेचे थोतांड!’

✍️ गजानन खंदारे समाजात देवाला “नवस” बोलण्याची परंपरा फार जुनी आणि खोलवर रुजलेली आहे. “देवाला नवस बोलला आणि तो पूर्ण झाला” म्हणजे देव पावला अशा असंख्य कथा, आख्यायिका आणि अनुभव आपण सतत ऐकत आलो आहोत.या अशा कथातुन नवसाला पावणारे अनेक देव जन्माला आलेत. किंवा घातले गेलेत अनेक देव, देवस्थाने आणि चमत्कार प्रसिद्ध झाले. अनेक ठिकाणांची…

Read More

देवाचा बाजार आणि हरवलेला माणूस! देव तुमच्याच शोधात..!

गेल्या अनेक वर्षांपासून मी अध्यात्म, धर्म, संस्कृती आणि परंपरा यांचा वाचन, अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या ज्ञानाच्या अथांग समुद्राला अजून साधा स्पर्शही करू शकलो नाही, ही जाणीव सतत मनात राहते. तेव्हा साहजिकच मनात अनेक प्रश्न उभे राहतात — नेमकं सत्य काय? चराचरात आणि माणसामाणसांत व्याप्त असलेला देव आज ठराविक धर्म विक्रेत्यांची आणि काही…

Read More

मन चंगा तो…!

काल सातारकर बाबा मंदिर सभागृहात संत शिरोमणी रविदास महाराज जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. खरं तर जयंती म्हंटलं कीपूजन, फोटो, मिरवणूक, डि जे, फार तर भाषणं आणि औपचारिक कार्यक्रम इतपतच गोष्ट मर्यादित राहते.पण इथे चर्मकार समाजाच्या स्वतःच्या स्थापित प्रबोधिनीने समाजासाठी नेमकं काय केलं आहे, कसं काम केलं आहे, याचा लेखा-जोखाच मांडला.हा लेखाजोखा केवळ माहिती देणारा…

Read More

“पर्वणी” धर्मविरोधी लोकांना समजवणार तरी कसे?

धर्माचं नाव घेतलं की काही लोकांना उगाच राष्ट्रवाद आठवायला लागतो.-खरं तर “राजकारणाला” मनासारखा आकार द्यायचा असेल तर धर्म जागवणं हेच सर्वोत्तम “साधन ” असतं —“राजकारणाच्या” सोयीसाठी राष्ट्रवादासोबत धर्म जागवणंही अनिवार्य असतंच! आणि हा धर्म जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी आपली हाडांची काडं करून, योगदान दिलं—त्यांचे योगदान लक्षात घेतलेच पाहिजे. मात्र समाजात काही मूठभर लोकं असे आहेत—की,ज्यांना धर्म…

Read More

महाराज त्रास सगळ्यांनाच होतो तर..!

सध्या इंदुरीकर महाराज हे टीकेचे लक्ष्य ठरत आहेत. त्यातच त्यांनी कीर्तनाचा फेटा उतरवून ठेवू व लग्नाचा बार याही पेक्षा थाटात उडवू..! अशी धमकीच त्यांच्याच भाषेत सांगायचं तर “कथित अवलादी” ना दिली!पण महाराज…किर्तन ही महाराष्ट्राची समृद्ध अशी परंपरा. “नाचू कीर्तनाचे रंगी..”म्हणत संत नामदेवांनी ही परंपरा सुरू केली. “दया धर्म” सांगणारेकिर्तन कशासाठी? तर वरील अभंगात त्याचा सार…

Read More

राक्षस कुळातील माझी आई..! अवताराच्या गोष्टी सांगायची पुन्हा पुन्हा..

माझी “आई” ही जुनी नववी पर्यंत शिकलेली पोथी, पुराण कथात ती डोकं खुपसून बसायची.ती खूपच “देवभोळी” होती असं नाही,पण “परोपकार ते परपीडा” या विचाराभोवती“देव आणि दानव” या “अवताराच्या” कथा मला ती लहानपणी नेहमी सांगायची.तेव्हा यांचा खरा आशय मला कळत नव्हता.पण, आपणही हातात शस्त्र घेऊन या राक्षसाचा संहार करावा असं मला नेहमी वाटायचं.तेव्हा आई मला घट्ट…

Read More

लोढाईच्या माळावर: गर्दीचा बाजार!

अश्विन शुद्ध नवमीला मी लोढाईच्या माळावर दर्शनासाठी गेलो होतो. त्या दिवशी इथे दरवर्षी एकदिवसीय मोठी यात्रा भरते. “लोढा-आई”चा माळ म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत ठिकाण – हिरवीगार टेकडी, जंगलाचं कवच आणि सभोवताल पसरलेलं गायरान व जंगल क्षेत्र . इथलं मंदिर हे केवळ दगड-विटांचं बांधकाम नाही, तर ग्रामीण लोक आणि कृषी संस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे….

Read More
Back To Top