विष्णुचा नववा अवतार :देव तुमच्याच शोधात..!

आपल्या हिंदू धार्मिक परंपरेत एकीकडे संत विचारांची वारकरी परंपरा, तर दुसरीकडे कर्मकांडप्रधान परंपरा दिसते. वास्तविक या दोन्ही परंपरा विचार, आचार आणि कृतीच्या पातळीवर एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत —

गेली अनेक वर्षे मी अध्यात्म, धर्म, संस्कृती आणि परंपरा यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत आहे.
मात्र या ज्ञानाच्या अथांग समुद्राला अजूनही नीटसा स्पर्शही करू शकलो नाही, ही जाणीव सतत मनात राहते.

तेव्हा साहजिकच प्रश्न उभा राहतो — कि मग …
ईश्वरप्राप्तीचा नेमका आणि खरा मार्ग कोणता?
हा विषय अत्यंत खोल आणि गहन आहे.
लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवते.
एकदा कावळा आणि मोर एकमेकांना भेटले.
मोर दिसायला सुंदर, चालणे ऐटीत; त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत असे.
कावळा मात्र रंग, आवाज, चालणे — सगळ्याच बाबतीत स्वतःला कुरूप समजत असे .
मनातून तो दुःखी झाला.

“रंग-रूप आपल्या हातात नाही,
पण निदान मोरासारखं चालता तरी येईल,”
असा विचार करून कावळा एकेदिवशी मोराकडे गेला.
काही दिवस मोरासोबत राहून त्याची चाल शिकण्याचा प्रयत्न केला,
पण ती काही शिकता आली नाही.
आणि या नादात कावळा स्वतःची मूळ चालही विसरून गेला.
म्हणूनच आज कावळा
ना मोरासारखा चालू शकतो,
ना स्वतःसारखा.
तो दोन पायांवर उड्या मारत चालतो.

आज आपली स्थितीही काहीशी अशीच झाली आहे.
सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग
भगवान विष्णूंनी आपल्या नवव्या अवतारात सांगितला.
पण तो अवतार — कोणता? — तो आपण स्वीकारलाच नाही. किबहुना आपण आपल्या मनाच्या देव्हाऱ्यात त्याला स्थान दिले नाही
ईश्वरप्राप्तीच्या मागे लागताना, आपली अवस्था कावळ्यासारखी होत चालली आहे.
आपल्या हिंदू धार्मिक परंपरेत
एकीकडे संत विचारांची वारकरी परंपरा,
तर दुसरीकडे कर्मकांड प्रधान सनातनी परंपरा दिसते.
वास्तविक या दोन्ही परंपरा

विचार, आचार आणि कृतीच्या पातळीवर
एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत —
काही अंशी तर विरोधातच.
आज मात्र या दोन्हींची
गोंधळलेली सरमिसळ होताना दिसते आहे.
आपल्या समाजात प्रामुख्याने
दोन वेगळ्या धार्मिक वाटा स्पष्टपणे दिसतात.
हा फरक नीट समजून घेतला,

तर चुकीचे कोणते याचे उत्तर आपोआप मिळते.
दुर्दैवाने,
अलीकडे आपणच आपल्या
धार्मिक, सांस्कृतिक, नैतिक, सामाजिक
आणि कौटुंबिक मूल्यांचा ऱ्हास करून घेत आहोत. क्रमशः –

गजानन खंदारे
जिल्हाध्यक्ष
संभाजी ब्रिगेड वाशिम

📌 Disclaimer (सूचना)

“या लेखातील मांडलेले विचार हे लेखकाचे वैयक्तिक चिंतन व अभ्यासावर आधारित आहेत. यामागे कोणत्याही धर्म, पंथ, परंपरा किंवा व्यक्तीच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. समाजात सकारात्मक विचार, आत्मपरीक्षण आणि विवेक जागृती व्हावी, हा यामागील उद्देश आहे. वाचकांनी याचा स्वीकार किंवा नकार स्वतःच्या बुद्धी, श्रद्धा आणि समजुतीनुसार करावा.”

app.lagnaakshada.com वर लॉंगिन करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top