✍️ गजानन खंदारे
आज वाऱ्याने आपला प्रवाह जरा बदलला होता.
कधी मंद, तर कधी अचानक झंझावातासारखा उसळत
तो स्वतःभोवती गिरक्या घेत धुळीचे लोट उडवत होता.
तरीही रणरणत्या उन्हात मृगजळाचे पाट स्पष्ट वाहताना दिसत होते.
अवतीभवतीच्या कडक उन्हाला तोंड देत माझा बाप मात्र अजूनही चालतच होता…
उन्हाची पारग वेळ केव्हाच टळून गेली होती.
त्याच्या अंगात आता त्राण, अवसान—काहीच उरले नव्हते.
सळसळणारं रक्तही जणू गोठलं होतं, आणि
अंगातून वाहणारा घामही आता आटून गेला होता.
खोपीच्या अडोशाला ठेवलेल्या एका पालवात
गुंडाळलेली कसलीशी वस्तू त्याने माझ्या हातात दिली…
तो हळूच म्हणाला,
“आता एवढंच आहे तुझ्यासाठी…”
मी चकित होऊन विचारलं, “काय आहे हे?”
तो म्हणाला,
“तुझ्या आजोबांना एका महात्म्याने दिलं होतं.
तुमच्या पिढ्यांच्या उद्धारासाठी हे कामी येईल असं सांगितलं होतं.
बापानं जपून ठेवलं… आता वारसाहक्काने
माझ्याकडे आलं… आणि आता तुझ्याकडे.
मी कधी उघडलं नाही… तुझ्यासाठी सांभाळून ठेवलं.
माझ्याकडे आता दुसरं काहीच नाही…
या व्यवस्थेने सगळं काढून घेतलं…”
बापूचं बोलणं ऐकून मी गोंधळलो.
मनात विचार आला—काहीतरी मौल्यवानच असेल…
सुवर्णमुद्रा, दागिना, किंवा काही तरी मोठं धन…
त्या उत्सुकतेने मी लगबगीने पालव उकलायला सुरुवात केली.
कागदात गुंडाळलेली ती जाड वस्तू हळूहळू उघडत गेलो…
आजोबांना मिळालेली ती भेट—जशीच्या तशीच होती.
आजोबांनी कधी उघडून पाहिली नव्हती…
बापानेही नाही…
ती माझ्यासाठीच जपून ठेवली होती.
आणि अखेर माझ्या हातात आलं—
जगातील महान ग्रंथांपैकी एक—
शेतकऱ्याचा आसूड आणि गुलामगिरी
क्षणभर मी स्तब्ध झालो…
मनात विचार चमकून गेला—
जर आजोबांनी, बापाने हे केव्हाच उघडून वाचलं असतं,
तर माझ्या बा-चा आसूड या व्यवस्थेवर कोरडे काढत ,
या लादलेल्या गुलामगिरीतून केव्हाच मुक्त झाला असता …
तर कदाचित या झोळीवाल्या बाबांच्या
खुळखुळ्या अवलादी इतक्या माजल्याच नसत्या…
जयंती निमित्त
तमाम फुले प्रेमींच्या विचाराच्या वारसदारांना समर्पित 🙏
—
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, वाशिम
- माझ्या बापाची वारसा-भेट
✍️ गजानन खंदारेआज वाऱ्याने आपला प्रवाह जरा बदलला होता.कधी मंद, तर कधी अचानक झंझावातासारखा उसळत तो स्वतःभोवती गिरक्या घेत धुळीचे लोट उडवत होता.तरीही रणरणत्या उन्हात मृगजळाचे पाट स्पष्ट वाहताना दिसत होते.अवतीभवतीच्या कडक उन्हाला तोंड देत माझा बाप मात्र अजूनही चालतच होता…उन्हाची पारग वेळ केव्हाच टळून गेली होती.त्याच्या अंगात आता त्राण, अवसान—काहीच उरले नव्हते.सळसळणारं रक्तही जणू… - पिंपळ, पोळे आणि हरवलेला बुद्ध..
कालची ती संध्याकाळची वेळ… आकाशात मंद उजेड शिल्लक होता, आम्ही तिघे—शिवाजी कव्हर, दिलीप भिसडे आणि मी—पार्डी तिखेच्या रस्त्याने लग्नासाठी निघालो होतो. गाडीच्या गतीतही मन कुठेतरी स्थिर होत होतं. तेवढ्यात बाजूच्या शेतात उभ्या असलेल्या एका पिंपळावर नजर स्थिरावली…तो पिंपळ—पानगळ झालेला, विरळ फांद्यांनी जणू आकाशाला स्पर्श करणारा— काळाच्या ओघात थकलेला वाटत होता. एके-वेळी हिरवागार असलेला तो वृक्ष… - “ब्रिगेडी-यन” परशुरामाला का मानत नाहीत ..!
काल अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाला गेलो होतो.उदगीर, शिरूर ताजबंद या भागात काही ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांचे अश्वारूढ पुतळे दिसले. या भागात महात्मा बसवेश्वरांना मानणारा लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि हा परिसर कर्नाटक सीमेच्या जवळच आहे.आज “अक्षय तृतीया” असून आजच “महात्मा बसवेश्वर” यांची जयंती आहे. समाजात समता, बंधुता आणि न्याय यांचा संदेश देणाऱ्या…
