प्रयत्न केल्याने यश मिळतंच, पण तेच जर योग्य आणि नियोजनपूर्वक झाले, तर ते हमखास आणि लवकर मिळतं. या गोष्टीवर माझा विश्वास आहे. याचा अनुभव मला नुकताच आला.
माझी मुलगी प्राजक्ता खंदारे-भिसे हि ‘येस बँकेत’ डेप्युटी मॅनेजर या पदावर कार्यरत राहून, मागील तीन महिने स्टेट बँकेच्या ‘सर्कल बेस ऑफिसर’ परीक्षेची तयारी करत होती. घड्याळाच्या काट्यावर सकाळी आठ ते रात्री आठ बँक आणि नंतर घर सांभाळून ती अभ्यासासाठी वेळ काढत होती. परीक्षा कठीण असल्याने अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून मी बायकोला अधूनमधून पुण्यात ठेवायचो. पंधरा दिवसांपूर्वी परीक्षेचा निकाल आला आणि परीक्षा पास झाल्याचे ती बोलली. परीक्षा पास होणे तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.
मागच्या शनिवारी ती मुलाखतीसाठी मुंबईत होती. नेमकी त्याच वेळी तिचे आजोबा अचानक वारल्याची बातमी आली. बायको पुण्यात आणि मुलगी मुंबईत… अखेर स्टेटसमुळे मृत्यूची बातमी सर्वदूर पसरलीच. आजोबा गेल्यावरही तिला सुट्टी मिळाली नाही. परवा ती उत्तरकार्यासाठी आली.
तासाभरापूर्वी मुंबई सर्कलसाठी तिची ‘सर्कल बेस ऑफिसर’ म्हणून निवड झाल्याचा मेल आला.
तिचं सार्वत्रिक कौतुक व्हावं यासाठी हा मजकूर मुळीच नाही, पण नवरा, घर आणि बँकेची कठीण नोकरी सांभाळून तिने हे उद्दिष्ट गाठलं, ते नैराश्य सोबत घेऊन परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरावं यासाठी…प्रपंच.
पोरी तुझं पोटभरून कौतुक व यासाठी तुला प्रत्येक कामात मदत करणाऱ्या तूझ्या नवऱ्याचं व तुझ्या परिवारातील सासु, सासरा,जाऊ ,भाऊ व घरकाम सावरणाऱ्या भावाचं व आणि तुला मानसिक धिर देणाऱ्या तुझ्या मायचं अभिनंदन!

— गजानन खंदारे, वडील
