महाराज त्रास सगळ्यांनाच होतो तर..!
सध्या इंदुरीकर महाराज हे टीकेचे लक्ष्य ठरत आहेत. त्यातच त्यांनी कीर्तनाचा फेटा उतरवून ठेवू व लग्नाचा बार याही पेक्षा थाटात उडवू..! अशी धमकीच त्यांच्याच भाषेत सांगायचं तर “कथित अवलादी” ना दिली!पण महाराज…किर्तन ही महाराष्ट्राची समृद्ध अशी परंपरा. “नाचू कीर्तनाचे रंगी..”म्हणत संत नामदेवांनी ही परंपरा सुरू केली. “दया धर्म” सांगणारेकिर्तन कशासाठी? तर वरील अभंगात त्याचा सार…
