त्या दिवशी मला भिंती बोलताना ऐकू आल्या..
.शाळेची दुपारची सुट्टी झाली होती.मध्यान्ह भोजनाचा मंद सुगंध अजूनही वातावरणात दरवळत होता. मैदानावर काही मुले कबड्डी, तर काही क्रिकेट व काही इतर खेळ खेळत होते आणि काही मुलं अजूनही डब्याभोवती गप्पा मारत बसली होती. वर्गात दोन-तीन मुलं वही उघडून राहिलेला गृहपाठ पूर्ण करत होती. काही मुली एकमेकींसमोर बसून पाठांतरात दंग होत्या.शाळा नेहमीसारखीच जिवंत होती.स्टाफ रूम…
