गजानन खंदारे
“माजी सरन्यायमूर्ती भूषण गवई स्वतःला आंबेडकरवादी म्हणवतात, पण ते धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर धाम) यांच्या पाया पडतात. अशा व्यक्तींनी बाबासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.त्यांनी बाबासाहेबांचे नाव घेऊ नये ” अशी जाहीर टिप्पणी शाम मानव यांनी केली
“हे शाम मानव कोण आहेत? त्यांना असा ‘सर्टिफिकेट’ देण्याचा अधिकार कोणी दिला? हल्ली प्रसिद्धीसाठी ते कुठलीही वक्तव्य करतात .” असा प्रतिवाद या राज्याचे खरेखुरे सर्वात मोठे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला
आता खरा प्रश्न व्यक्तींचा नाही… तर विचारांच्या प्रामाणिकतेचा आहे!
भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ‘बाबा बागेश्वर धाम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीची भेट घेतल्याचा प्रसंग हा केवळ “वैयक्तिक श्रद्धा” इतकाच मर्यादित राहत नाही; तो सामाजिक न्यायाच्या चळवळीसमोर एक प्रश्नचिन्ह उभं करतो.
विशेषतः, जेव्हा त्यांची पार्श्वभूमी आंबेडकरी विचारसरणीशी जोडली जाते.
अगदी अलीकडील उदाहरण पाहिलं तर —
खजुराहो येथील मंदिरात भगवान विष्णूची मूर्ती पुनर्स्थापित करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना याच न्यायमूर्तींनी स्पष्ट शब्दांत म्हटलं होतं:
“ही प्रसिद्धीसाठी केलेली याचिका आहे. जाऊन खुद्द देवतेलाच सांगा.”
या वक्तव्यातून न्यायालयीन वेळेबद्दलची अस्वस्थता आणि त्यांचा तर्कनिष्ठ दृष्टिकोन दिसून आला होता.या टिप्पणीवर स्वयंघोषित सनातनी गटांकडून तीव्र टीका झाली, इतकेच नव्हे तर एका वकिलाने न्यायालयात त्यांच्यावर चप्पल फेकली होती.
मग आजचा हा विरोधाभास नेमका कसा समजायचा?
दुसरीकडे हा स्वयंघोषित बाबा अल्पसंख्याकांविरुद्ध व संत महामानवा विरुद्ध सतत गरळ ओकण्यासाठी ओळखल्या जातो त्या बाबाला इतका जाहीर आदर का द्यावा ? हा प्रश्न उपस्थित करणं चुकीचं कसं?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांमध्ये तर्कवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा -विरोध स्पष्टपणे मांडलेला आहे.
म्हणूनच, स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या व्यक्तीकडून विचार आणि कृती यामधील सुसंगती अपेक्षित असणं स्वाभाविक आहे.
आता इथेच मुद्दा अधिक गंभीर होतो…
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश — या विचारवंतांनी अंधश्रद्धेविरोधात लढा दिला आणि त्यासाठी प्राणही गमावले.
त्यांच्या हत्यांना आपण “विचारांवर हल्ला” म्हणून पाहिलं.
मग आज त्याच विचारांच्या कसोटीवर उभं राहायचं की नाही?
आणखी एक मुद्दा —
श्याम मानव यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना “कोण आहेत?” असं विचारणं हे केवळ मुख्यमंत्री म्हणुन राजकीय प्रतिवाद नाही; तर देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक त्यांच्या कार्याचा अवमान करतात.हे सर्टिफिकेट तुम्हाला कोण देणार?
आता खरा प्रश्न फक्त एका वक्तव्याचा नाही… तर राज्याच्या भूमिकेचा आहे!
आता हाच धीरु बागा या राज्याच्या मुख्यमंत्र्याला माहित नसलेले “शाम मानव” यांच्या आव्हानाला सामोरे न जाता ढुंगणाला पाय लावत नागपुरातूनच पळाला होता.ते शाम मानव कोण आहेत हे माहित नसणे यातच राज्याची सर्वोच्च भूमिका स्पष्ट होते.
मग आज पुन्हा एकदा प्रश्न उभा राहतो कि …
संजय गायकवाड यांच्या संदर्भात गंभीर आरोप, वादग्रस्त वातावरण…
आणि दुसरीकडे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाबाबत दस्तूर खुद्द देवाभाऊ समोरच केले जाणारे वादग्रस्त उल्लेख…
हे सगळं घडत असताना,
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,गडकरी,भागवत हे त्या …पिठावर त्यांच्या समक्ष एक फडतूस बाबा आमच्या राजाचा जाहीर अवमान करतो तेव्हा प्रफुल्लीत चेहऱ्याने हे त्रिकुट त्यांचे समर्थन करताना उभ्या महाराष्ट्राला दिसते . यावरून राज्यकर्ते मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री भूमिका स्पष्टच नाही ठाम दिसते.
शिवाजी महाराज म्हणजे फक्त इतिहास नाहीत, ते महाराष्ट्राच्या अस्मितेचा आधार आहेत
त्यांच्या कर्तृत्वाला “लोककथा” म्हणणं हे केवळ राज्याच्या मुख्यमंत्र्याच अज्ञान असेल तर इतिहास आणि स्वाभिमानाचा अवमान करणाऱ्या लोंकाना संविधानिक पदावर राहण्याचा अधिकार उरतो का ? याचा विचार झालाच पाहिजे.
कारण मुख्यमंत्री पद हे केवळ प्रशासन चालवण्याचं नसतं,
ते समाजाच्या भावना, इतिहास आणि मूल्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारीही असते.
जय जिजाऊ 🙏

गजानन खंदारे संभाजी ब्रिगेड वाशिम
